Rabi Sowing : रब्बी ज्वारीची ८ हजार ९७५ हेक्टरवर पेरणी

Rabi Season : रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नाही. त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या, अन्नधान्य व चारा यासाठी महत्त्व असल्यामुळे यंदा या दोन जिल्ह्यातील अनेक शेतकरी ज्वारीला पसंती देत आहेत.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदा सरासरी पाऊस पडलेला पाऊस यांच्यात तफावत आहे.परिणामी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नाही. त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या, अन्नधान्य व चारा यासाठी महत्त्व असल्यामुळे यंदा या दोन जिल्ह्यातील अनेक शेतकरी ज्वारीला पसंती देत आहेत.

चालू रब्बी हंगामात शुक्रवार (ता. ३) परभणी जिल्ह्यात ७ हजार ८१२ हेक्टर (६.९१ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात १ हजार १६३ हेक्टर (९.९४ टक्के) अशी दोन जिल्ह्यात मिळून एकूण ८ हजार ९७५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यात एकूण रब्बीचा ३२ हजार ७९७ हेक्टरवर पेरा झाला आहे.

Rabi Season
Rabi Sowing : रब्बी पेरण्यांत ज्वारी, मोहरी, मसूर आघाडीवर

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. ३) पर्यंत १३ हजार ९२० हेक्टरवर (५.१४) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ७ हजार ८१२ हेक्टरवर (६.९१ टक्के),गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १७८ हेक्टर (०.४५ टक्के) पेरणी झाली आहे. हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी ५ हजार ८६४ हेक्टर (५.२३ टक्के) पेरणी झाली आहे.

Rabi Season
Onion Price : कांदा @ २५ रुपये ; मदर डेअरीच्या सफल आउटलेटवर स्वस्तात विक्री

हिंगोलीत रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. ३) पर्यंत १८ हजार ८७७ हेक्टर (१०.६७ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी १ हजार १६३ हेक्टर (९.९४ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी २ हजार ९६२ हेक्टर (६.९७ टक्के) पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १४ हजार ६७० हेक्टर (१२.२१ टक्के), करडईची २०५ पैकी ५३ हेक्टर (२५.७७ टक्के) पेरणी झाली आहे.

परभणी-हिंगोली जिल्हा ज्वारी पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (शुक्रवार,ता.३ पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी २०००० ३४० १.७

जिंतूर १५४४६ १५५ १.००

सेलू १७४०७ .१७५४ १०.०८

मानवत ७५७१ ९५ १.२५

पाथरी ९६०४ १६६७ १७.३६

सोनपेठ ६८७६ १५० २.१८

गंगाखेड १७०७७ ३५५१ २०.७९

पालम २०१३० ०० ००

पूर्णा ८१७५ १०० १.२२

हिंगोली १५३४ ००० ०००

कळमनुरी ८३० ००० ०००

वसमत ६११२ ००० ०००

औंढा नागनाथ २५३१ ६५० २५.६८

सेनगाव ६८९ ५१३ ७४.४६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com