Thresher Machine Theft : ऑनलाइन जुगार पैसे हारल्याने चोरले थ्रेशर

Online Gambling Addiction : ऑनलाइन जुगारात पैसे हरल्याने दोघांनी सेल्लूर नागरेड्डी येथील सरपंच जितेंद्र मानकर यांच्या मालकीची थ्रेशर मशीन चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Online Gambling Addiction
Online Gambling AddictionAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : ऑनलाइन जुगारात पैसे हरल्याने दोघांनी सेल्लूर नागरेड्डी येथील सरपंच जितेंद्र मानकर यांच्या मालकीची थ्रेशर मशीन चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोहित भगरत पावडे (वय २३) आणि यश भास्कर वडस्कर (वय २२) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही चेक ठाणेवासना गावातील आहेत.

सेल्लूर नागरेड्डी येथील बस स्थानक चौकात असलेली थ्रेशर मशीन चोरीला गेली होती. यासंदर्भात पोंभुर्णा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. थ्रेशर मशीन चोरीतील दोन आरोपी चंद्रपुरात असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती.

Online Gambling Addiction
Online Gambling: ग्रामीण महाराष्ट्र जुगाराच्या विळख्यात

पथकाने चंद्रपुरातून रोहित भगरत पावडे आणि यश भास्कर वडस्कर यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी थ्रेशर मशीन चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील दोन्ही आरोपी हे सधन कुटुंबातील आहे. मोबाईलमधील ऑनलाइन सट्ट्यात पैसे हरल्याने त्यांनी चोरी करणे सुरू केले.

Online Gambling Addiction
Online Gambling Addiction: जीवघेणा विळखा

चेक ठाणेवासना येथील ट्रॅक्टरच्या मदतीने सेल्लूर नागरेड्डी येथील सरपंच जितेंद्र दिलीप मानकर यांच्या मालकीची थ्रेशर मशीन चोरून आक्सापूर येथे आणली. तेथून दोन दिवसांनी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने जुनोना येथील व्यसनमुक्त केंद्राजवळ ठेवली.

बाबूपेठ चौकातील एका भंगार विक्रेताला सोबत घेत पिकप वाहनाने चंद्रपुरातील हिंदुस्थान भंगार विक्रेत्याला विकल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील तपास ठाणेदार राजकमल वाघमारे, पोलिस हवलदार नरेश निमगडे, शिपाई कादेवणी आमटे, पोहेकर करीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com