Pre-Monsoon Rain : सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

Rain Update : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट झाली असून, दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण, असे वातावरण निर्माण होत आहे.
Pre-Monsoon Rain : सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट झाली असून, दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण, असे वातावरण निर्माण होत आहे. रविवारी (ता. १२) मात्र सकाळपासून वातावरणात बदल झाला, जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी तालुक्यांतील काही भागांत हलका स्वरूपाचा मॉन्सूनपूर्व पाऊस झाला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान सरासरी ४० अंश सेल्सियच्या पुढे आहे. मागच्या आठवड्यात तर ते ४३ ते ४४ अंशावर पोहोचले होते. परंतु गेल्या दोन दिवसांत मात्र वातावरणात काहीसा बदल झाला आहे. तापमानात घट होत आहे.

Pre-Monsoon Rain : सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाचा साडेआठ हजार हेक्‍टरला फटका

तसेच ढगाळ वातावरणही आहे. रविवारी मात्र दिवसभर काही भागांत कडाक ऊन आणि तर काही भागांत ढगाळ वातावरण झाले होते. उत्तर सोलापूर, मोहोळ भागात शनिवारी रात्री हलका पाऊस झाला, तर रविवारीही पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली.

Pre-Monsoon Rain : सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी वादळी पावसाचा दणका सुरूच

उत्तर सोलापुरातील नान्नज, वडाळा भाग, मोहोळसह नरखेड, शिरापूरसह काही भागांत हलका पाऊस झाला. पंढरपुरातही काही गावांत हलक्या सरी कोसळल्या. बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात सकाळी अकराच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस झाला.

यावर्षी हा पहिलाच मॉन्सूनपूर्व पाऊस ठरला. या पावसाने पांगरीतील आठवडे बाजारातील शेतकऱ्यांची व व्यापाऱ्याची धांदल उडाली. पेरणीपूर्व मशागतीस आता अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. विजेचा कडकडाटासह तासभर पाऊस झाल्याने येथे रस्त्याच्या कडेला, शेतातील तालीस पाणी साचले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com