Onion Rates : कांद्याचे दर १०० ते १५० च्या फरकाने उतरले

Onion Export Rates : कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्याच्या निर्णयानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा दरात १०० ते १५० रुपयांच्या फरकाने चढ-उतार राहिला.
Onion Market
Onion Marketagrowon
Published on
Updated on

Onion Export News : कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्याच्या निर्णयानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा दरात १०० ते १५० रुपयांच्या फरकाने चढ-उतार राहिला. सोलापुरात बुधवारी (ता. २३) कांद्याला सरासरी १२०० रुपये इतका दर मिळाला, गेल्या आठवड्यात या निर्णयाच्या आधी हाच दर साधारण १३०० ते १४०० रुपयांवर होता.

Onion Market
Onion Rate : निर्यात शुल्क वाढीनंतर नगर जिल्ह्यात कांदा दरात घसरण

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्याने आणि दळण-वळणाची सुविधा उपलब्ध असल्याने सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते, साहजिकच, कांद्याचे मोठे मार्केट सोलापूरमध्ये आहे. पण सध्या आवकेमध्ये सोलापूरमधील स्थानिक कांदा तुलनेने कमीच असतो. बाहेरील जिल्ह्यातील कांदा मात्र अधिक असतो.

Onion Market
Onion Issue : पुण्यात कांदा निर्यातीवर शुल्क वाढीच्या विरोधात बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून कांद्याला मागणी वाढते आहे. शिवाय कांद्याच्या दरही टिकून राहिले होते. पण गेल्या आठवड्यात कांद्याच्या निर्यातीवर सुमारे ४० टक्के निर्यातशुल्क लागू केल्याने कांदा बाजारावर त्याचा परिणाम झाला आहे.

सध्या त्याचा थेट मोठ्या फरकाने परिणाम नसला, तरी सध्या कांद्याच्या प्रतिक्विंटलामागे १०० ते १५० रुपयांपर्यंत चढ-उतार होतो आहे. गेल्या आठवड्यात निर्यात शुल्कवाढीच्या आधी कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३२०० ते ३५०० रुपये दर होता, तो आता बुधवारी (ता.२३) ३००० रुपयांवर खाली आला आहे. तर गेल्या आठवड्यातील सरासरी १३०० ते १४०० रुपयांचा दर, आता ११०० ते १२०० रुपयांवर खाली आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com