Onion Rate : निर्यात शुल्क वाढीनंतर नगर जिल्ह्यात कांदा दरात घसरण

Onion Export Duty : केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेल्या ४० टक्के निर्यात शुल्काच्या निर्णयानंतर साधारण तीनशे ते चारशे रुपयांनी दर घसरले आहे. आवकेतही पन्नास टक्के घसरण झाली.
Onion Rate
Onion RateAgrowon
Published on
Updated on

Onion News : अहमदनगर जिल्ह्यात पारनेर येथील बाजार समितीत बुधवारी (ता. २३) आणि सर्वाधिक आवक असलेल्या नगर, घोडेगाव, राहुरी बाजार समितीत सोमवारी (ता. २१) लिलाव झाले. दोन दिवसांतील लिलावाची स्थिती पाहता केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेल्या ४० टक्के निर्यात शुल्काच्या निर्णयानंतर साधारण तीनशे ते चारशे रुपयांनी दर घसरले आहे. आवकेतही पन्नास टक्के घसरण झाली.

Onion Rate
Onion Export : कांदा खरेदी खरेदीच्या निर्णयाला शेतकरी संघटनांकडून विरोध

साधारणपणे निर्यातकर वाढीच्या निर्णयाआधी २०० रुपयांपासून जास्तीत जास्त २८०० रुपयांपर्यंत, तर सरासरी १४०० ते १६०० रुपये दर होते. निर्णयानंतर २०० रुपयांपासून जास्तीत जास्त २ हजार ते २२०० रुपयांपर्यंत व सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे पाहायला मिळाले. कोपरगाव बाजार समितीत दररोज लिलाव होतात. मात्र दोन दिवसांपासून आवक आली नाही. इतर बाजार समित्यातही ५० टक्के आवक कमी झाली आहे.

Onion Rate
Onion Export : कृषिमंत्री मुंडेंनी घेतली वाणिज्यमंत्र्यांची भेट; केंद्र सरकार दोन लाख टन कांदा खरेदी करणार

साधारण सात आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कांद्याला गेल्या पंधरा दिवसांपासून दर वाढू लागले असताना केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर लावल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. निर्यातकर लागू केल्यानंतर झालेल्या लिलावात नगर जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा दरावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

नगर जिल्ह्यात सर्वाधिक आवक नगर, राहुरी, घोडेगाव (नेवासा), पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर बाजार समित्यांत होते. नगरला सोमवारी, गुरुवारी व शनिवारी, पारनेर, घोडेगावात सोमवारी, बुधवारी व शनिवारी, राहुरीत रविवारी, मंगळवारी व शुक्रवारी लिलाव असतात.

शुक्रवारी २०० रुपयांपासून २९०० रुपयांपर्यंत दर मिळाला तर शनिवारी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय लागू झाल्यानंतर हा दर २५०० रुपयांवर आला. आवकेतही मोठी घट झाली. श्रीरामपूरला आज झालेल्या लिलावात साठ टक्के आवक कमी झाली. २३०० रुपयांपर्यंत जास्तीत जास्त दर होता. येथे निर्णयाआधी २६०० पेक्षा अधिक जास्तीत जास्त दर होता. दोन दिवसांत झालेल्या लिलावाचा विचार केला तर केंद्र शासनाच्या निर्यातकर लावण्याच्या निर्णयाअगोदर २०० रुपयांपासून जास्तीत जास्त २८०० रुपयांपर्यंत, तर सरासरी १४०० ते १६०० रुपये दर होते.

निर्णयानंतर २०० रुपयांपासून जास्तीत जास्त २ हजार ते २२०० रुपयांपर्यंत व सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. नगरला अडीच हजारांपर्यंत दर होता. कोपरगावातही निर्यातकर लागू होण्याआधी अडीच हजारांपर्यंत दर होता. कोपरगावात आठवड्यातील सहा दिवस लिलाव असतात. मात्र तीन दिवसांत आवकच झाली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com