Safflower Sowing : करडईची ५१० हेक्टरवर पेरणी

Safflower Farming : यंदा रब्बी हंगामात करडई पिकाची पुणे विभागात सरासरीच्या दोन हजार ४१६ पैकी ५१० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Safflower Farming
Safflower FarmingAgrowon
Published on
Updated on

Pune News : तेलबिया म्हणून ओळख असलेल्या करडई पिकाकडे शेतकरी हळूहळू वळत आहेत. यंदा रब्बी हंगामात करडई पिकाची पुणे विभागात सरासरीच्या दोन हजार ४१६ पैकी ५१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच सरासरी २१ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी विभागात याच काळात एक हजार १६९ हेक्टर म्हणजेच सरासरी ४८ टक्के पेरणी झाली होती. चालू वर्षी मॉन्सूनोत्तर जोरदार पाऊस झाल्यामुळे वेळेत वाफसा न झाला नाही. त्यामुळे करडईची वेळेत पेरणी न झाल्याने पेरणीत चांगलीच घट झाली आहे. शेतकऱ्यांनी उशिराने करडईच्या पेरणीस सुरुवात केली आहे. सध्या पिकाची अवस्था चांगली असून अनेक ठिकाणी पिकाची वाढ चांगली झाली आहे.

Safflower Farming
Safflower Farming : जिरायती क्षेत्रासाठी करडई फायदेशीर

यंदा थंडी सुरू झाली असल्याने पिके जोमदार आली आहेत. प्रामुख्याने चार महिने कालावधी असलेल्या करडईची अनेक जण नोव्हेबरपर्यंत पेरणी करतात. त्यामुळे येत्या काळात पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच अधूनमधून बदलत असलेल्या ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात मावा, तुडतुडे या किडींचाही पिकांवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुणे विभागातील शेतकऱ्यांमध्ये तेलबियांविषयी चांगलीच जनजागृती केली जात आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात करडई पिकाच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात करडईचे सरासरी ३६१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ११५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी सरासरी ३२ टक्के झाली आहे. यामध्ये पाथर्डी, कर्जत, नगर, शेवगाव तालुक्यात बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत.

Safflower Farming
Safflower Cultivation : सुधारित पद्धतीने करडई लागवड

पुणे जिल्ह्यात सरासरी २३ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. त्यापैकी यंदा एकट्या बारामती तालुक्यात २९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही करडईविषयी महत्त्व वाढले आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा या तालुक्यांतील शेतकरी करडई पिकाकडे वळत आहेत. यंदा मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून ही पेरणी सुमारे ३१६ हेक्टरवर झाली आहे. त्यापाठोपाठ माढा तालुक्यातही पेरणी झाली आहे.

करडई पिकांची झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्केवारी

नगर ३६१ ११५ ३२

पुणे २३ २९ १२६

सोलापूर २०३२ ३६७ १८

एकूण २४१६ ५१० २१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com