Onion Nursery : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

Onion Production : यंदा ही लागवड मुबलक जलसाठ्यांच्या भागात काहीशी वाढेल. तर दुष्काळप्रवण क्षेत्रात लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे.
Onion nurseries
Onion nurseriesAgrowon

Jalgaon News : खानदेशात आगाप खरीप कांदा लागवडीची तयारी तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात सुरू झाली आहे. यंदा लागवड काहीशी वाढेल किंवा स्थिर राहील, असे चित्र आहे.खानदेशात खरिपातील कांद्याची लागवड सात ते साडेसात हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. यंदा ही लागवड मुबलक जलसाठ्यांच्या भागात काहीशी वाढेल. तर दुष्काळप्रवण क्षेत्रात लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे.

परंतु एकूण लागवड वाढू शकते, असाही अंदाज आहे. धुळे, शिंदखेडा भागांत दुष्काळी स्थितीमुळे लागवड घटेल. परंतु धुळ्यातील साक्रीत लागवड स्थिर राहील. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील कांद्याची पाच ते साडेपाच हजार हेक्टरवर लागवड केली जाते.

Onion nurseries
Onion Cultivation : खानदेशात कांदा लागवड तयारी वेगात

एकट्या साक्री तालुक्यातील लागवड सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर असते.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, चाळीसगाव, धरणगाव, जामनेर या भागांत कांदा लागवड वाढू शकते. तर नंदुरबारातील शहादा, नवापूर, नंदुरबार भागात कांदा लागवड किंचित वाढेल. एकूण लागवड यंदा सात हजार ८०० ते सात हजार ९०० हेक्टरवर पोहोचू शकते.

कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत. काही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आले. तसेच दरही सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल, असे मिळाले. कापूस पिकात नुकसान येत असल्याने अनेक शेतकरी कापूस लागवड कमी करून त्यात कांदा पीक घेण्याची तयारी करीत आहेत.

Onion nurseries
Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

कांदा लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू आहे. अनेकांनी कृषी केंद्रांतून बियाणे खरेदी केले आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांकडून कांदा बियाणे खरेदी केले आहे. कांदा लागवड वाढू शकते, यामुळे पुढे कांदा रोपांचे दरही अधिक असतील. यामुळे लागवडीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपापल्या कांदा रोपवाटिका निर्मितीवर भर दिला आहे.

अनेकांनी व्यावसायिक रोपवाटिका तयार केल्या असून, त्यातील रोपांची विक्री केली जाईल. कांदा रोपवाटिका जळगावातील धरणगाव, चोपडा, यावल, धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारातील शहादा भागात तयार करण्यास या आठवड्यात सुरुवात झाली आहे. यंदा किमान १६० ते १८० हेक्टरवर कांदा रोपवाटिका खानदेशात राहतील, असाही अंदाज आहे.

ठिबक, मिनी स्प्रिंकलरचा उपयोग

कांदा रोपवाटिकांची निर्मिती पावसाळ्यात किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर केल्यास त्यात कमी अधिक पावसाने नुकसानीची भीती असते. यामुळे शेतकरी याच आठवड्यात रोपवाटिकांत बियाणे पेरणीचे नियोजन करीत आहेत.

पाऊस सुरू होण्यापूर्वी रोप तरारल्यास पुढे त्याचे कमी व अधिक पावसात नुकसान फारसे होत नाही, असे शेतकरी मानतात. तसेच लागवडदेखील आगाप करता येईल. रोपवाटिकांमध्ये ठिबक, मिनी स्प्रिंकलरच्या मदतीने सिंचन केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com