Onion Nursery : खानदेशात यंदा कमी कांदा रोपवाटिका

Onion Crop : खानदेशात यंदा कांदा रोपवाटिका सुमारे २५० हेक्टरवर आहेत. यंदा रोपवाटिकांची संख्या कमी आहे. यामुळे लागवडदेखील कमी राहील किंवा स्थिर राहू शकते, अशी स्थिती आहे.
Onion nurseries
Onion nurseriesAgrowon

Onion Farming : जळगाव : खानदेशात यंदा कांदा रोपवाटिका सुमारे २५० हेक्टरवर आहेत. यंदा रोपवाटिकांची संख्या कमी आहे. यामुळे लागवडदेखील कमी राहील किंवा स्थिर राहू शकते,  अशी स्थिती आहे. कांदा पिकासाठी धुळे, जळगाव, नंदुरबार प्रसिद्ध आहे.

खरिपातील लागवड खानदेशात सात ते आठ  हजार हेक्टरवर केली जाते. यंदा ही लागवड कमी होईल, असे सुरुवातीपासून सांगितले जात आहे. आगाप कांद्याची लागवड या महिन्याच्या सुरुवातीला काहींनी केली आहे. नियमित लागवड लवकरच सुरू होईल. अनेक शेतकरी उशिराच्या किंवा लेट खरीप कांद्याला पसंती देताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी कांदा रोपांसाठी आपल्याच क्षेत्रात बियाणे पेरणी करून रोपवाटिका उभ्या केल्या आहेत.

Onion nurseries
Onion Nursery Production : कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग

यापूर्वी अनेक शेतकरी नाशिक, नगर भागांतून कांदा रोपांची खरेदी करून लागवड करायचे. परंतु गेली तीन वर्षे कांदा रोपे उपलब्ध होण्यास प्रतिकूल वातावरणामुळे अडचणी आल्या. अतिपावसात गेल्या वर्षी रोपवाटिकांचे नुकसान झाले होते. यामुळे रोपांचे दरही गगनाला भिडले. अनेक शेतकरी लागवडच करू शकले नाहीत. यामुळे देखील शेतकऱ्यांनी आपापल्या रोपवाटिका उभारल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल भागात जुलैमध्ये कमी व अधिक पावसात काही शेतकऱ्यांच्या रोपवाटिकांचे नुकसान झाले. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे खरेदी करून रोपवाटिका उभ्या कराव्या लागल्या आहेत.

तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये तण वाढल्याने देखील रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. या रोपवाटिकांमध्ये तणनाशकांची फवारणी, तणनियंत्रण, संप्रेरकांची फवारणी, खते देणे व इतर कार्यवाही सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, एरंडोल, धरणगाव, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव भागांत कांदा रोपवाटिका अधिक आहेत. धुळ्यात शिंदखेडा, साक्री व धुळे भागांत रोपवाटिका आहेत. तर नंदुरबारात नंदुरबार, नवापूर, शहादा भागांत रोपवाटिकांची बरी आहे. काही शेतकऱ्यांनी १० ते १५ एकरांत कांदा लागवडीचे नियोजन केले असून, त्या दृष्टीने रोपवाटिका तयार केल्या आहेत. यंदा कांदा बियाणे महाग होते, तरीदेखील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली व रोपवाटिका वाढविल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com