Onion Dehydration Process : कांदा निर्जलीकरण प्रक्रिया

Onion Processing : कांद्यापासून विविध निर्जलीकृत अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ‘एफएसएसएआय' द्वारे निर्धारित केलेल्या विविध मानकांचा उपयोग केला जातो.
Onion Dehydration Process
Onion Dehydration ProcessAgrowon
Published on
Updated on

डॉ. अनुप्रीता जोशी, डॉ. राजेश क्षीरसागर

Onion Dehydration : कांद्यापासून विविध निर्जलीकृत अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ‘एफएसएसएआय' द्वारे निर्धारित केलेल्या विविध मानकांचा उपयोग केला जातो. निर्जलीकृत कांदा विविध प्रकारचे मसाले तयार करण्यासाठी मुख्य घटक म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे इन्स्टंट नूडल्स, बर्गर, पिझ्झा, सँडविच, विविध प्रकारच्या मसाला निर्मितीमध्ये वापर करतात.

निर्जलीकृत कांद्याच्या विविध प्रकारच्या रूपांतरणामध्ये सामान्यतः कांद्याचे गोल काप, पावडर, कांद्याचा तुकडा, कांद्याच्या रिंग्स, संपूर्ण कांदा, कांदा क्यूब इत्यादी प्रकार तयार करतात. कन्व्हेटीव्ह ड्राईंग म्हणजेच गरम हवेच्या मदतीने कांदा सुकविला जातो.

कांदा निर्जलीकरण करण्यासाठी फ्लुइडाइज्ड बेड ड्रॉइंग, सोलर ड्रॉइंग, इन्फ्रारेड ड्रॉइंग, व्हॅक्यूम मायक्रोवेव्ह ड्रॉइंग आणि ऑस्मोटिक ड्रॉइंग या पद्धतींचा वापर केला जातो. निर्जलीत कांद्याला जागतिक बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

Onion Dehydration Process
Onion Processing Industry : कांदा पेस्ट निर्मितीसाठी लागणारी यंत्रे

निर्जलीकरणासाठी यंत्रणा

प्रतवारी यंत्र, सोलणी यंत्र, कॉम्प्रेसर, कन्व्हेयर, व्हॅक्यूम पॅकेजिंग यंत्र, सौर वाळवणी यंत्र, बॉल मिल किंवा

हॅमर मिल सोबत सायक्लोन सेपरेटर, फॉर्म फील आणि सीलिंग यंत्र, तुकडे करणारे यंत्र, लिक्विड फिलिंग यंत्र इत्यादी.

निर्जलित कांद्यासाठी मानके

निर्जलीकृत कांदा बुरशी, खराब झालेला भाग, बाह्य कागदी साल, पाने आणि मुळांपासून मुक्त असावा.

साल, खोडाचा भाग किंवा इतर बाह्य कचरा लागलेला असू नये.

तयार झालेला निर्जलीकृत कांदा कुठल्याही प्रकारच्या विकरांच्या प्रतिक्रियांपासून मुक्त असावा.

तयार झालेल्या निर्जलीकृत कांद्यापासून पुनर्जलीत कांदा तयार करताना त्याला मूळ कांद्याची चव, सुगंध आणि झणझणीतपणा असावा.

निर्जलीकृत कांदा बाह्य सुगंध, खराब वास किंवा तेलकट वासाने ग्रासलेला नसावा.

कुठल्याही प्रकारचे जिवंत अथवा मृत किडे, किड्यांचे तुकडे किंवा इतर प्राण्यांचे अवशेष विरहित असावा.

निर्जलीत कांदा तयार करताना बाहेरून मिश्रित केलेल्या विषारी रंगांचा उपयोग केलेला नसावा.

निर्जलीकृत कांदा तयार करताना ‘एफएसएसएआय'द्वारे नियमित आणि परवानगी दिलेल्या अन्न घटकांच्या समावेशाने युक्त असावा.

Onion Dehydration Process
Onion Processing : निर्जलीकरणातून कांद्याचे मुल्यवर्धन

‘एसएसएआय' मानके

बाह्य पदार्थ वजनाने ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही.

ओलावा:

अ) चूर्ण कांद्याच्या बाबतीत

वजनाने ५.० टक्क्यांपेक्षा जास्त नाही.

ब) चूर्ण कांदा व्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ वजनानुसार ८.० टक्क्यांपेक्षा जास्त नाही.

कोरड्या आधारावर एकूण खनिजांचे प्रमाण वजनानुसार ५.० टक्क्यांपेक्षा जास्त नाही.

‘एचसीआय'मध्ये एकूण खनिजांचे प्रमाण वजनाने ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही

पेरोक्सिडेस: नकारात्मक

कैरीचे आमचूर

चांगल्या प्रतीची कच्ची कैरी स्वच्छ धुऊन त्याची साल काढावी. सुरीने त्याचे बारीक तुकडे करावेत. हे तुकडे दोन टक्के मिठाच्या द्रावणात एक तासासाठी बुडवून ठेवावेत. दोन तासासाठी ०.४ टक्के पोटॅशियम मेटाबेसल्फाईड च्या द्रावणात भिजवून ठेवावेत. त्यानंतर ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला सुकवावेत.

आमचूर पावडर तयार करण्यासाठी वाळलेले तुकडे यंत्रामध्ये बारीक दळून घ्यावेत. तयार आमचूर पावडर पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून थंड आणि कोरड्या जागी साठवावी.

डॉ. अनुप्रीता जोशी, ९६३७२४०४०६ (सहाय्यक प्राध्यापक, अन्नतंत्र महाविद्यालय,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com