Onion Market : कांद्याच्या दरात क्विंटलमागे ४०० रुपयांपर्यंत घसरण

Onion Rate : कांदा निर्यातबंदीमुळे गेल्या १०५ दिवसांत कांदा उत्पादकांना ३ हजार कोटींवर आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : कांदा निर्यातबंदीमुळे गेल्या १०५ दिवसांत कांदा उत्पादकांना ३ हजार कोटींवर आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांत फक्त ग्राहकांचा विचार झाला तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसताना त्याकडे व्यवस्थेने दुर्लक्ष केले आहे. आता पुन्हा मार्च महिन्यात ४०० ते ६०० रुपयांपर्यंत घसरण दिसून आली. परिणामी, शेतकऱ्यांचा पाय आर्थिकदृष्ट्या अधिक खोलात जात असल्याची स्थिती आहे.

डिसेंबर वगळता कांद्याला दोन हजारांवर कधीच दर मिळाला नाही. तर एक हजार रुपयांवर सातत्याने दर मिळत आहे, अशी दराच्या बाजूने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यातच मार्चच्या दुसऱ्या सप्ताहात १,९०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाले.

मात्र लगेच तिसऱ्या सप्ताहात क्विंटलमागे ४०० ते ६०० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्नाचे गणित कोलमडले आहे. त्यातच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

Onion Market
Onion Market : कांदा उत्पादकांचे नुकसान ३१०० कोटींवर

सध्या जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लेट खरीप कांद्याची आवक कमी होत असून, थोड्याफार प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक होऊ लागली आहे. अशा स्थितीत शेतकरी वाढत्या उन्हाच्या चटक्यात लेट खरीप कांदा काढून विक्री करत आहे.

मात्र बाजारामध्ये सुधारणा नाहीच; मात्र सातत्याने घसरण दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात प्रामुख्याने लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मुंगसे (मालेगाव), उमराणे, देवळा, चांदवड, येवला या बाजार समित्यांमधून कांद्याची आवक हळूहळू वाढत होती.

दरम्यान कांद्याला ३ हजार रुपयांवर दर मिळत असताना ग्राहकांची ओरड नसताना कांद्याची उपलब्धता व दर नियंत्रणासाठी केंद्राने निर्यातबंदी केल्याने भावातील घसरण आजही थांबायला तयार नाही. प्रतिकूल स्थितीत कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तोट्यात जाण्याची वेळ आली आहे. तर निर्यातबंदीनंतर सरासरी दरात जवळपास २,००० रुपयांची दरात तफावत आहे.

Onion Market
Onion Market : कांदा प्रश्‍नावर सत्ताधाऱ्यांची कोंडी

दर घसरणीमागील काही कारणे

- राष्ट्रीय निर्यात सहकारी मर्यादित (एनईसीएल) या संस्थेकडून कांदा निर्यात करण्यासाठी होणारी कांद्याची खरेदी ठरावीक घटकांकडून सुरू असल्याने कांदा खरेदीचे केंद्रीकरण झाल्याने संधी कमी.

- सध्या देशांतर्गत मागणी घटल्याने पुरवठा मंदावला; तर काही प्रमाणात स्थानिक आवक.

- होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या कांदा रॅक लोडिंग कामकाज कमी.

जिल्ह्यांतील बाजार समित्यांतील सरासरी दर स्थिती (प्रतिक्विंटल/रुपयांत)

बाजार समिती----आवक----कमाल दर---किमान दर

पिंपळगाव बसवंत...३००...१,३५१...१,१३०

लासलगाव...७८१...१,३३९...१,२८०

येवला...५००...१,४३१...१,२५०

मनमाड...३५०...१,२८५...१,१३०

देवळा...४००...१,३५०...१,२७५

मुंगसे (मालेगाव)...५५०...१,४२५...१,२०१

नायगाव (सिन्नर)...५००...१,४००...१,३२५

(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

सध्या देशांतर्गत बाजारपेठेत मागणी आहे. खुली निर्यात प्रक्रिया बंद आहे. जी निर्यात सुरू आहे त्यामध्ये माल पाठविण्याच्या मर्यादा आहे.
- नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
सध्या बाजारात मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाले आहे. पदरमोड करून कांदा उत्पादन घेतले; मात्र यात आर्थिक बाजू शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी आहे.
- सचिन कडलग, कांदा उत्पादक, विंचूर, ता. निफाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com