Team Agrowon
भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे प्रमाण ६ टक्के आहे.
कांद्याचे दर काही वेळा चढे तर काही वेळा अत्यंत कमी होतात. यावर उपाय कांदा निर्जलीकरण हा किफायतशीर व फायद्याचा मार्ग आहे.
कांद्याचे काप, पावडर, फ्लेक्स तयार करण्यासाठी फ्ल्यूडाईज्ड बेड ड्रायिंग पद्धत वापरली जाते.
कांद्याची पावडर, काप, कीस इ. उत्पादनांना हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
निर्जलित कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यासाठी मुख्यत्वे पांढरा कांदा वापरला जातो.
स्वादिष्ट चवीसोबत कांद्यामध्ये असलेला विशिष्ट झणझणीतपणामुळे, कांदा विविध पदार्थ व औषधी गुणधर्मांसाठी वापरला जातो.
कांदा निर्जलीकरणासाठी मायक्रोवेव्ह ही जलद, सोपी, कार्यक्षम पद्धत आहे.