Onion Cultivation : कांदा लागवड घटणार; विषम वातावरणाचा परिणाम

Weather Effect On Onion Cultivation : खानदेशात कांदा लागवड यंदा सुमारे ११ ते १२ हजार हेक्टरवर होऊ शकते, पण कांदा रोपवाटिकांचे सध्याच्या विषम वातावरणामुळे नुकसान होत आहे.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात कांदा लागवड यंदा सुमारे ११ ते १२ हजार हेक्टरवर होऊ शकते, पण कांदा रोपवाटिकांचे सध्याच्या विषम वातावरणामुळे नुकसान होत आहे. शेतकरी बुरशीनाशके, कीडनाशकांचा उपयोग करून रोपवाटिका वाचवीत आहेत. यामुळे पुढे कांदा लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे.

मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. पेरणीनंतर रोपवाटिकांमध्ये बियाण्याची उगवण बऱ्यापैकी झाली. पण पाऊस, ढगाळ वातावरण अगदी नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून आहे. नोव्हेंबरमध्ये सुरुवातीला तीन-चार दिवस कोरडे वातावरण होते.

Onion Cultivation
Onion Cultivation : उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट

नंतर ढगाळ वातावरण तयार झाले. यात नोव्हेंबरमध्ये पाऊसही खानदेशात झाला. नंतर दोन दिवस कोरडे वातावरण होते. पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. सध्याही निरभ्र, कोरडे वातावरण नाही. दुपारी उकाडा होतो. सध्या ढग दाटून येतात.

यामुळे कांदा रोपवाटिकांमध्ये बुरशीजन्य रोग पसरत असून, किडींचाही प्रादुर्भाव होत आहे. ही समस्या रोखण्यासाठी शेतकरी कीडनाशके, बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत आहेत. यातच विषम वातावरणात रोपवाटिकांमध्ये नुकसान झाले आहे.

Onion Cultivation
Onion Cultivation : कांदा लागवड २५ टक्क्यांनी घटणार

लागवडीसाठी पुरेसे रोप राहणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे लागवडीचे नियोजनही कोलमडणार आह. तसेच कांद्याची लागवड कमी होईल. रोपवाटिका हव्या तशा नसल्याने लागवड घटणार आहे.

रोपवाटिकांचे नुकसान जळगाव, धुळ्यातील सर्वच भागांत झाले आहे. धुळ्यातील साक्री, शिरपूर भागांत अधिकच्या रोपवाटिका आहेत. तर जळगावात यावल, चोपडा, जळगाव तालुक्यात रोपवाटिका अधिक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com