Summer Onion Cultivation : उन्हाळ कांदा लागवड खानदेशात कमीच राहणार

Onion Market News : खानदेशात उन्हाळ कांद्याची किंवा रब्बीमधील कांद्याची लागवड यंदा कमी राहणार आहे. यंदा क्षेत्र साडेआठ ते नऊ हजार हेक्टरवर राहील, असे दिसत आहे.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon Onion News : खानदेशात उन्हाळ कांद्याची किंवा रब्बीमधील कांद्याची लागवड यंदा कमी राहणार आहे. यंदा क्षेत्र साडेआठ ते नऊ हजार हेक्टरवर राहील, असे दिसत आहे. लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करण्याचे नियोजन सुरू केले आहे

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, यावल, चोपडा, जळगाव या भागात उन्हाळ कांदा अधिक असतो. धुळ्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा आणि नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार भागात उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते.

या भागात काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करण्याचे नियोजन केले आहे. वाण निवड, जमीन आदी कार्यवाही पूर्ण झाली आहे. कांदा बी पेरणी मात्र अल्प शेतकऱ्यांनीच रोपवाटिकांत केली आहे. काही शेतकरी रोपांची विक्री करून आपला खर्च कमी करण्याचे नियोजन करीत आहेत. ५० फूट बाय तीन फूट आकाराच्या सरीमधील कांदा रोपांची एक ते दीड हजार रुपयात विक्री केली जाते.

शेतकरी गरजेनुसार कांदा रोपांची खरेदी करतात. यामुळे खर्च कमी होऊन त्यातील गुंतवणूक इतर पिकांत करण्याचेही नियोजन शेतकरी करीत आहेत. धुळ्यातील लामकानी, कापडणे, शिंदखेड्यातील टाकरखेडा, जातोडा आदी भागात दर्जेदार कांदा रोपे विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. जळगावमधील यावल तालुक्यातील किनगाव, चोपड्यातील अडावद भागात रोपे विक्री केली जातेय उन्हाळ कांद्याची लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन हजार हेक्टरवर होईल.

Onion Cultivation
Ambegaon Onion Cultivation : आंबेगाव तालुक्यात रब्बीच्या कांदा लागवडीला प्रारंभ

धुळ्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर आणि नंदुरबारत सुमारे दीड हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. यंदा लागवड काहीशी कमी राहणार आहे. कारण मागील दोन हंगाम कांद्याला दर हवे तसे नाहीत. तसेच पाऊसही कमी आहे. मागील एप्रिल महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंत कांद्याचे दर दबावात होते. मध्यंतरी किंवा सप्टेंबरमध्ये दरात सुधारणा झाली. परंतु पुन्हा दर फारशे वाढले नाहीत.

Onion Cultivation
Onion Cultivation : उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट

सध्याही कमाल दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. यामुळे शेतकरी लागवड कमी करण्याचे नियोजन करीत आहेत. लागवड कमी करून कलिंगड, मका आदी पिकांची लागवड काही कांदा उत्पादकांनी करण्याची तयारी केली आहे. कलिंगडाचे पीक ६० ते ६५ दिवसात येते. तर मका पिकाचे कमी खर्चात किंवा कांदा पिकापेक्षा कमी खर्चात उत्पादन हाती येते. शिवाय चाराही मिळतो.

यामुळे शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याचे दिसत आहे. कांद्याची लागवड डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होईल. ती पुढे १५ जानेवारीपर्यंत सुरू राहते. अनेक शेतकऱ्यांनी कमी दिवसात येणाऱ्या कांदा बियाण्याला पसंती दिली आहे. यंदा कांदा बियाणे मुबलक होते. त्याला हवा तसा उठाव नव्हता. बियाणे दर वेगवेगळे असून, अनेक शेतकरी शेतकऱ्यांकडून उत्पादीत बियाण्याची थेट खरेदी करीत आहेत.

या भागात केली जाते लागवड

जळगाव ः चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, यावल, चोपडा, जळगाव.

धुळे ः धुळे, साक्री, शिंदखेडा.

नंदुरबार ः नवापूर, नंदुरबार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com