Onion Cultivation : कायगाव परिसरात कांदा लागवडीची लगबग

Onion Farming : गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या कायगाव व परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या कायगाव व परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सर्वांचे कामे सोबत आल्याने शेतात कांदा लागवडीसाठी मजुरांची कमतरता भासत असून अनेकांचे लागवडीचे सौदे रखडल्याचे चित्र आहे. त्यात कांद्याचे पडलेले बाजारभाव आणि बदलत्या हवामानाचा सामना करीत शेतकरी कांदा लागवडीसाठी सज्ज झाला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित होऊन शेतीची कामे ठप्प झाली होती. सर्वत्र ओलेचिंब शेत शिवार असल्याने काही ठिकाणी रब्बीच्या पेरणी आणि कांदा लागवडीसाठी व्यत्यय आला होता. आता जरा शेतीची वापसा आली असून सर्वदूर शेती कामांना वेग आला आहे. त्यात ही

Onion Cultivation
Onion Cultivation : कांदा लागवडीसाठी मजुरांचा तुटवडा

बदलत्या हवामानामुळे तसेच शेतीतील वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आला आहे. मजुरांची भरमसाट वाढलेली मजुरी, खतांच्या वाढलेल्या किमती आणि निसर्ग शेती करण्यास साथ देत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. या सर्व गोष्टींवर मात करून बळिराजा स्वप्नांची शिदोरी घेऊन कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करीत आहे.

कांदा रोपांचा तुटवडा

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने कांदा रोपवाटिकांची दुरवस्था होऊन रोपे वाया गेली. अवकाळी पावसानंतर मोठ्या प्रमाणावर धुके पडल्यामुळे रोपांवर मररोग करप्याचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर रोपांचे नुकसान झाल्याने सर्वत्रच कांदा रोपांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कांद्याच्या रोपाला भाव अधिक वाढले आहेत. तरीही रोप विकत घेण्यासाठी शेतकरी धावपळ करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Onion Cultivation
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे बाराशे कोटींचा फटका ; भरपाईची मागणी

गोदाकाठ पट्ट्यात कांदा लागवड; दुसरीकडे पाणी टंचाई

गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या पाण्याची सोय असलेल्या पट्ट्यात कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. जामगाव आणि भेंडाळा महसूल मंडळात ३०० हेक्टरवर कांदा लागवड होण्याची चिन्हे आहेत. तसेच गाळपेरा क्षेत्रातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतात. यंदा गोदावरी नदीकाठचा बागायती भाग अपवाद वगळता इतर ठिकाणी दुष्काळ परिस्थितीमुळे कांदा लागवड करण्यासाठी पाणी टंचाई आहे.

सध्या कांद्याला खर्चाच्या तुलनेत पाहिजे तसा बाजारभाव मिळेना. त्यातही उन्हाळी कांद्याचे पैसे होतील की नाही याची खात्री नसताना देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करीत आहे. त्यातच लागवड करताना मजूर टंचाई भासत आहे.
पांडुरंग वाघ, कांदा उत्पादक शेतकरी, धनगरपट्टी, ता. गंगापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com