Onion Market
Onion MarketAgrowon

Onion Auction : पांढुर्ली उपबाजारात कांद्याचे लिलाव सुरू

Onion Market : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजार आवारात बुधवारपासून (ता. १७) श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर कांदा लिलावाचा प्रारंभ सभापती शशिकांत गाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
Published on

Nashik News : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजार आवारात बुधवारपासून (ता. १७) श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर कांदा लिलावाचा प्रारंभ सभापती शशिकांत गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपसभापती सिंधु कोकाटे, संचालक अनिल शेळके, प्रकाश तुपे उपस्थित होते.

Onion Market
Onion Purchase Center Inspection : खासगी कांदा खरेदी केंद्र तपासणीसाठी १२ पथके

अंदाजे १,४०० गोण्यांची आवक झाली. घोरवड येथील ज्ञानेश्वर हगवणे यांच्या कांद्याला मुहूर्ताला प्रतिक्विंटल कमाल १,५११ रुपये इतका दर मिळाला. पहिल्या दिवशी किमान ३००, कमाल १५११ व सारासरी १,३५० रुपये दर मिळाला.

पांढुर्ली पंचक्रोशितील शेतकऱ्यांनी कांदा गोणीमध्ये भरून लिलावासाठी दुपारी साडेतीनच्या आत पांढुर्ली उपबाजार आवारात आणावा, कांदा शेतीमालाचे लिलाव प्रचलित पद्धतीने दर सप्ताहाच्या सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Onion Market
Onion Dehydration Process : कांदा निर्जलीकरण प्रक्रिया

व्यापारी नंदकुमार जाधव, अभिजित सोनवणे, दिलीप सोनवणे, सुजय सोनवणे, गणेश चौधरी, संदीप वराडे, देवेंद्र जाधव आदींनी कांदा लिलावात भाग घेतला. विलास हारक, हिरामण मंडलीक, नवनाथ आव्हाड, राजू गवळी, उत्तम चव्हाणके, सुदाम वाजे, किरण पवार, संजय तुपे, ज्ञानेश्वर हगवणे, सोमनाथ केदार, संजय पवार आदी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता.

या वेळी रमेश सकट, कैलास वाजे, पुंडलीक गायकवाड, मुकुंद वाजे, रतन वाजे, विष्णूपंत वाजे, निवृत्ती चव्हाणके उपस्थित होते. बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव राजेंद्र जाधव, व्यवस्थापक रंगनाथ डगळे, अर्जुन भांगरे यांनी लिलावाचे कामकाज पाहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com