Onion Market
Onion MarketAgrowon

Onion Price : कांदा @ २५ रुपये ; मदर डेअरीच्या सफल आउटलेटवर स्वस्तात विक्री

Onion Rate : केंद्र सरकाराने मदर डेअरीमध्ये बफर स्टॉकमधून कांदे विकण्यास सुरूवात केली आहे.

Onion Market Rate : देशभरात महागाईने सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते, तर आता कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाला असताना आता ग्राहकांना खूश करण्यासाठी बफर स्टॉकमधून मदर डेअरीमध्ये २५ रुपये किलोने कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Onion Market
Onion Market Price : किमान निर्यातमूल्य अधिसूचनेनंतर कांदा दरात घसरण; क्विंटलमागे सहाशे रुपयांपर्यंत तफावत

यंदा मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने बाजार आवक कमी झाल्याने कांद्याचे दर चांगलेच वाढल आहेत. त्यामुळे बाजारात महिनाभरापूर्वी ३० ते ४० रुपये किलोने मिळणारा कांदा आता ७० ते ८० रुपये किलोने मिळत आहे. सणासुदीच्या तोंडावर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी बफर स्टाॅक बाहेर काढला आहे.

नाफेडच्या माध्यमातून २१ राज्यांमधील ५५ शहरांमध्ये कांद्याची विक्री सुरू केली आहे. मोबाईल व्हॅन आणि स्टेशन आउटलेटसह ३२९ रिटेल केंद्रांद्वारे तो कमी किमतीत विक्री करत आहे. त्याच वेळी, कमी किमतीत कांदा विकण्यासाठी NCCF ने २० राज्यांतील ५४ शहरांमध्ये ४५७ रिटेल केंद्रे देखील उघडली आहेत. २५ रुपये किलो दराने कांदा विकत आहे. तर, केंद्रीय भांडार ३ नोव्हेंबरपासून दिल्ली-एनसीआरमधील मदर डेअरीच्या सफल आउटलेटमधून २५ रुपये किलोने कांद्याची किरकोळ विक्री करत आहे.

केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५ लाख टन कांद्याचा बफर स्टॉक ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात २ लाख टन अतिरिक्त बफर तयार करण्याची योजना सरकारने आखली आहे. सरकारच्या या पावलांमुळे कांद्याच्या घाऊक भावात घसरण होत असली तरी त्याचा परिणाम किरकोळ बाजारात अद्याप दिसून येत नाही. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात घसरण होऊ शकते, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com