Kolhapur Crop Damage
Kolhapur Crop Damageagrowon

Kolhapur Crop Damage : कोल्हापूरमधील १ लाख हेक्टरमधील पिके अडकली शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Kolhapur Crop Loss : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातली आहे. खरिपातील काढणीला आलेली एक लाख हेक्टरमधील पिके शेतात अडकली आहेत.
Published on

Kolhapur Crop Damage Rain : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. खरिपातील काढणीला आलेली १ लाख हेक्टरमधील पिके शेतात अडकली आहेत. सुमारे २० हजार हेक्टरमधील काढणीला आलेले भुईमूग पीक शेतात कुजू लागले आहे. भाताचे ७० हजार हेक्टर पीक शेतात अडकले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मागची ८ दिवस झालेल्या पावसाने पूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे.

जिल्ह्यात यंदा खरिपाचे २ लाख ७५ हेक्टर क्षेत्र होते. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे यावर्षी पिके चांगली होती. जुलैमध्ये महापुराने व अतिवृष्टीमुळे ४७ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यानंतर शेतकऱ्यांना जिराईत, कोरडवाहू, माळरानावरील पिकांचा आधार होता, परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस जोरदार झाल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण चित्रच बिघडले आहे. ऑक्टोबरमध्ये ६९ ते ११३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे काढणीला आलेली पिके शेतात अडकून राहिली आहेत.

शेतकरी हिम्मत जाधव म्हणाले, ‘३ एकर २० गुंठे सोयाबीन पीक घेतले होते. पावसामुळे काढणीला आलेले पीक शेतात अडकले आहे. शेंगा टरफल काळे पडले असून, पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हंगाम पुढे जात असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले.

Kolhapur Crop Damage
Flood Damage Crop Kolhapur : कोल्हापुरात पूर नुकसानीचे १२२ कोटी रुपये जमा होण्यास सुरूवात

भाताचे ९० हजार हेक्टर क्षेत्र होते. भाताचे ७० हजार हेक्टर काढणीला आलेली पिके पावसामुळे शेतात अडकून राहिली आहेत. काही ठिकाणी भाताची कापणी व मळणी सुरू असताना पाऊस पडल्यामुळे काढलेल्या काढणीपश्‍चात पिकांचे नुकसान होत आहे. सर्वात मोठा फटका भुईमुगाला बसला आहे. ३६ हजार हेक्टर भुईमूग पीक होते. यातील १४ ते १५ हजार हेक्टर पीक शेतकऱ्यांनी काढून घेतले आहे. उर्वरित २० हजार हेक्टरमधील भुईमूग पीक उभे असल्याचा अंदाज कृषी विभागाने अंदात व्यक्त केला आहे.

सततधार पावसामुळे जाळी आणि शेंगेच्या आऱ्या कुजल्या असून, जमिनीत असलेल्या भुईमुगाला मोड आले आहेत. सोयाबीनचे ४० हजार हेक्टर क्षेत्र होते. जमिनीच्या वरती पीक असल्यामुळे पाण्याने सऱ्या भरल्याने जास्त पाण्यामुळे सोयाबीनचे टरफल काळे पडत आहेत. सोयाबीनचे १० हजार हेक्टर क्षेत्र काढणीला आलेले पीक शेतात अडकून राहिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com