Mohan Agashe : शरद जोशींच्या विचारांची शेतकरी चळवळीला गरज

Sharad Joshi : शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य सध्या चर्चेत येत आहे. शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य सुधारायचे असेल तर ते गोळ्याने सुधारणार नाही. त्यासाठी शरद जोशींनी ज्या पद्धतीने चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभारी दिली.
Mohan Agashe
Mohan Agashe Agrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य सध्या चर्चेत येत आहे. शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य सुधारायचे असेल तर ते गोळ्याने सुधारणार नाही. त्यासाठी शरद जोशींनी ज्या पद्धतीने चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभारी दिली. त्यांच्या विचारांची आज शेतकरी चळवळ खऱ्या अर्थाने उभी राहणे गरजेचे आहे, असे मत अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

शिवार फाउंडेशन आणि सरहद संस्थेमार्फत जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘सेंटर फॉर फार्मर्स मेंटल हेल्थ’ या केंद्राचे उद्‌घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्याहस्ते शुक्रवारी (ता. ११) पुण्यातील पत्रकार भवन येथे झाले. त्यावेळी श्री. आगाशे बोलत होते. या वेळी ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक डॉ. आदिनाथ चव्हाण हे प्रमुख पाहुणे, तर प्रगतशील शेतकरी समीर डोंबे, रिसर्च स्कॉलर, सीएफएमएचचे संचालक विनायक हेगाणा, ‘सरहद’चे संचालक अनुज नहार आदी उपस्थित होते.

Mohan Agashe
Agriculture Well Scheme : कृषी क्रांती, कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीला आता चार लाखांचे अनुदान

श्री आगाशे म्हणाले की, आज शेती करणाऱ्या मुलाच लग्न होऊ शकत नाही, कारण मुलींना नोकरी करणारा मुलगा हवा असतो. ही अत्यंत वाईट परिस्थिती असून हे वास्तव आहे. सध्याचे जे काही शिक्षण आहे, अतिशय बंडल आहे, अशी धारणा आहे. त्याने पदव्या मिळत असतील, पण ज्ञान मिळत नाही.

आजच्या शिक्षणाने अशिक्षित लोक वाढली. परंतु खेडेगावातील कष्ट करणारा माणूस हा अशिक्षित पण सुसंस्कृत दिसून येईल. आज सुसंस्कृत माणसाची व संवेदनशील शिक्षणाची गरज आहे. तरच शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा प्रश्न सुटू शकतील. मानसिक आरोग्य हे आभाळातून पडत नाही. ते काही वेगळं नसून ते मन, शरीर यांच्याशी जोडलेले आहे.

ॲग्रो विशेष

आदिनाथ चव्हाण म्हणाले की, हजारो वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शोषणाची परंपरा सुरू आहे. त्यामागे अनेक कारणे असून जागतिकीकरण होत असताना औद्योगिक क्रांती झाली. त्यानंतर ही व्यवस्था वेगाने घसरत गेली. त्यातून शोषण मजबूत होत गेले. शेतकऱ्यांचे शोषणाचे संघटित जागतिकीकरण हे दीडशे वर्षांपूर्वी सुरू झाले. त्यावेळी उद्योगांना स्वस्तात कामगार हवे होते. म्हणून कामगारांना कमी दरात अन्नधान्य मिळण्यासाठी सरकारकडून मालाचे दर कमी ठेवण्यासाठी पाऊले उचलण्यात आली.

Mohan Agashe
Agriculture Subsidy : सात लाख शेतकऱ्यांना २१०० कोटींचा लाभ

त्यामुळे कमी पगारात ती व्यक्ती राबवून घेण्यासाठी ती व्यवस्था तेव्हापासून सुरू झाली, ती आजपर्यंत सुरू आहे. मध्यंतरी हरित क्रांती आली, त्यातून शेती आमूलाग्र बदलली. कारण उत्पादन वाढविणे गरजेचे होते. लोकसंख्या अधिक असल्याने त्यांना अन्नधान्य मिळण्यासाठी त्याची गरज होती. पूर्वी बलुतेदारी आधारित असलेल्या शेतीपद्धती बदलून व्यावसायिक शेतीपद्धती झाली. त्याच्यामध्ये दोष कोणाचा नाही. शेतकऱ्यांचाही नाही. त्यातून शेतकऱ्याचा बाजार व्यवसाय उभा राहिला. पण तो मूळ बाजार त्याच्या अंगात राहिला नाही. तर तो खुल्या मनाचा दिलदार आहे.

प्रगतशील शेतकरी समीर डोंबे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार केला जात नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्यासारखे प्रकार घडत आहे. आजच्या फेसबुक, इन्स्टाग्रामच्या जमान्यात हा मुद्दा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामध्ये माझा मोलाचा वाटा आहे. मानसिकता बदलली नसती तर मी उद्योजक झालो नसतो. या वेळी अनुज नहार यांनी प्रास्तविक केले. सरहद संस्थेचे लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com