Onion Cultivation : एक लाख १३ हजार हेक्टरवर कांदा लागवड

Onion Farming : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात रब्बीत १ लाख १३ हजार ६२७ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात रब्बीत १ लाख १३ हजार ६२७ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.

अजूनही लागवडी जोरात सुरू आहेत. त्यामुळे यंदा रब्बी आणि उन्हाळी मिळूनच दीड लाखापेक्षा अधिक हेक्टरवर कांदा लागवड होण्याचा अंदाज आहे. खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी मिळून यंदा चाळीस हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.

उसाचा आणि साखर कारखान्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून कांदा, कापूस व अन्य पिकांचे क्षेत्र वाढत आहे. अलीकडच्या चार-पाच वर्षांत कांद्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

Onion
Onion Export Duty : कांद्यावरील निर्यात शुल्क तत्काळ रद्द करण्याची मागणी

मागील दोन वर्षांत कांद्याला पुरेसा दर मिळाला नाही. यंदाही फारसा दर नाही असे असूनही कांदा लागवड क्षेत्र वाढतच आहे. खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी मिळून साधारणपणे दोन लाख हेक्टरवर कांद्याचे क्षेत्र असते. यंदा त्यात बऱ्यापैकी वाढ होताना दिसत आहे.

यंदा खरिपात २० हजार २६८ हेक्टर, लेट खरिपात ५५ हजार ३४८ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्‍चित केले होते. मात्र यंदा खरिपात ३६ हजार ३८१, तर लेट खरिपात ७८ हजार ८१४ असे १ लाख १५ हजार १९५ हेक्टरवर लागवड झाली होती. रब्बीचे १ लाख १९ हजार ५६१ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्चित आहे. यंदा आतापर्यंतच रब्बीत १ लाख १३ हजार ६२७ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.

Onion
Onion Farmer : कांदा उत्पादकांनी स्वतःचीच माहिती बाजार समितीला द्यावी

अजूनही लागवडी जोरात सुरू आहेत. उन्हाळी कांदा लागवड रब्बीतच धरली जाते. यंदा वर्षभरात आतापर्यंत खरीप, लेट खरीप, रब्बी मिळून २ लाख २८ हजार ८२२ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड आहे. तीस ते चाळीस हजार हेक्टर क्षेत्र वाढणार असल्याने यंदा वर्षभरातील मिळून पावणेतीन लाख हेक्टरपर्यंत कांदा लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असे प्रशासन सांगत असले तरी आतापासूनच काही भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यंदा पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, शेवगाव, कर्जत भागात कांदा पिकाला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

रब्बीतील कांदा लागवड (हेक्टरमध्ये)

अहिल्यानगर ः २९०४, पारनेर ः ३१,८२४, पाथर्डी ः १२५, कर्जत ः ८८१९, जामखेड ः ७३७८, श्रीगोंदा ः ११०५९, श्रीरामपूर ः ४२६०, राहुरी ः ८२३, नेवासा ः २०१२१, शेवगाव ः ९०१०, संगमनेर ः ५७०, कोपरगाव ः ८३३६, अकोले ः ६२४०, राहाता ः ३४१६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com