Mahesh Gaikwad
कृषी क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय योगदानासाठी केरळच्या सत्यनारायण बेलेरी या अल्पभूधारक शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कारने गोरविण्यात आले आहे.
सत्यनारायण हे अल्पभूधारक शेतकरी असून ते भाताची शेती करतात. याशिवाय त्यांनी पारंपरिक भाताच्या ६५० वाणांचे संवर्धन केले आहे.
शेतीसोबतच त्यांनी भाताच्या पारंपरिक वाणांचे संवर्धनाचे काम करतात. त्यांनी पारंपरिक भात पिकाच्या शेकडो वाणांची 'सीड बँक' तयार केली आहे.
सत्यनारायण यांची सीड बँक पाहण्यासाठी दूरवरून शेतकरी येतात.
पारंपरिक भात वाणांचे संवर्धन आणि बियाणे बँकेमुळे यामुळे त्यांना सीडिंग सत्या ही ओळख मिळाली आहे.
'राजकायम' वाणाच्या भातशेती करण्याचे श्रेयसुध्दा सत्यनारायण यांनाचं दिले जाते.
सत्यनारायण यांच्या मदतीने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये राजकायम भाताची शेती केली जाते.
ज्यामध्ये एडी कुनी हे वाण पुराच्या पाण्यातही तग धरू शकते. तसेच मनिला जातीचा भात खाऱ्या पाण्यातही पिकवला जावू शकतो. त्यांच्या सीड बँकेत सुगंधित भाताचे अनेक वाण आहेत.
याशिवाय सत्यनारायण यांनी शिवम आणि त्रिनेत्रा या दोन भाताचे वाण विकसित केले आहेत.