
Chh. Sambhajinagar News : शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचविणे तसेच शासकीय योजनेबाबत माहिती देणे या उद्देशाने विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २८) आदर्श गाव किनगाव येथे करण्यात आला.
यावेळी आ. अनुराधाताई चव्हाण, सरपंच मनीषा चव्हाण, उपसरपंच किशोर चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपायुक्त विकास सुरेश बेदमुथा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, पुणे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण सुवर्णा जाधव, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पाटील, गटविकास अधिकारी उषा मोरे, कार्यकारी अभियंता बांधकाम सुखदेव काकड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय फुंसे, कार्यकारी अभियंता सिंचन विजय कांबळे, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा शेळके, ग्रामपंचायत अधिकारी अरुण चित्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बागडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या दोन खोल्यांचे लोकार्पण करण्यात आले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आदर्श गाव किनगाव येथील प्राथमिक शाळेत भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पशुसंवर्धन दवाखाना यांची पाहणी केली. गावाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. गावातील कुटुंबांना ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळ्या करण्यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक उप आयुक्त विकास सुरेश बेदमुथा यांनी केले. श्री. वेदमुथा यांनी ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ या उप्रक्रमाबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांशी संवाद व्हावा. नाळ जुळावी, सर्व यंत्रणा गावात आली. मराठवाड्यातील ७६ गावांत हा उपक्रम राबविणार आहे. छोट्या अडचणी, प्रत्येक गावात काय अडचण आहे एक दिवस गावाकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवितांना लोकप्रतिनिधी व अधिकारी या रथाची दोन चाके आहेत. रथाची दोन्ही चाके एकत्रित आली तर रथ पुढे घेऊन जाता येईल, यासाठी समन्वय महत्वाचा आहे. , असे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त गावडे म्हणाले, की केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत ठराविक कालावधीत पोचविण्याच्या अनुषंगाने ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत (ग्राम दरबार)’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येणार आहे. विभागातील आठ जिल्ह्यातील ७६ तालुक्यांतील प्रत्येकी एका गावात २८ फेब्रुवारीपासून उपक्रमाची सुरुवात होणार असून, गावागावांत जाऊन अधिकाऱ्यांचा नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.