Solar Energy : बुलडाण्यात २ हजार ग्राहक झाले वीज निर्माते

Solar Power : महावितरणच्या रूफ टॉप योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील २०२० वीज ग्राहकांच्या छतावर वीजनिर्मिती होत असल्याने त्या वीज ग्राहकांना वीजबिल शून्यापर्यंत कमी करणे शक्य झाले आहे.
Solar Energy
Solar EnergyAgrowon

Buldana News : महावितरणच्या रूफ टॉप योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील २०२० वीज ग्राहकांच्या छतावर वीजनिर्मिती होत असल्याने त्या वीज ग्राहकांना वीजबिल शून्यापर्यंत कमी करणे शक्य झाले आहे. जिल्ह्यातील इतर ग्राहकांनी महावितरणच्या योजनेत सहभागी होऊन घराच्या छतावर वीजनिर्मिती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.

सौरऊर्जा ही स्वच्छ आणि प्रदूषण विरहित ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. शिवाय रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. तीन किलोवॉटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे १ लाख ५७ हजार खर्च येतो व त्यामध्ये अंदाजे ५४ हजार रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकाला जवळपास १ लाख ३ हजार रुपये खर्च येतो.

Solar Energy
Solar Energy Generation : बुलडाणा जिल्ह्यात लवकरच १९५ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती

सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते.

सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो, पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. सौरऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी ३ किलोवॉट ते दहा किलोवॉट क्षमतेचे पॅनेल्स बसविले, तर वीस टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तथापि, औद्योगिक ग्राहकही रूफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत.

Solar Energy
Solar Power Project : प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांकडून विरोध

सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या mahadiscom.in/ismart या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतींत महावितरणची मदत मिळते. सौरऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो.

रूफ टॉप सोलरसाठी बँक कर्ज देते

सूर्योदय योजनेत छतावर रूफ टॉप सोलर बसविण्यासाठी कोणत्याही बँकेकडून हप्त्यांवर (EMI) कर्ज उपलब्ध होऊ शकते. रूफ टॉप सोलर बसविल्यामुळे शुन्य होणारे वीज बिलाचे पैसे ग्राहक बँकेचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वापरू शकते.त्यामुळे ग्राहकांना अधिक सुलभरीतने आर्थिक भुर्दंडाविना रूफ टॉप सोलर बसविता येऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com