Solar Agriculture Scheme : शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा वीज, महावितरणची नवी योजना

CM Solar Agriculture Channel Scheme : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी सिंचनासाठी दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
Solar Agriculture Scheme
Solar Agriculture SchemeAgrowon

Chief Ministers Solar Agriculture Scheme : घरगुती ग्राहकांसह कृषी ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी महावितरणने पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी सिंचनासाठी दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

सुमारे १ लाख १२ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे. योजनेसाठी जमीन ताब्यात घेण्यात आल्या असून, पहिल्या टप्प्यात निवडलेल्या उपकेंद्रांच्या सक्षमीकरणाचे काम सुरू झाले आहे.

कृषी पंपांना शेतीसाठी रात्री वीजपुरवठा केला जातो. तो दिवसाही सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची वर्षानुवर्षाची मागणी होती, त्यासाठी महावितरणने सकारात्मक पावले टाकली आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतर्गत दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी निधीची उपलब्ध केली आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील ४३ उपकेंद्रांच्या ठिकाणी ७९५ एकर जमिनीवर १५९ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याद्वारे सुमारे ६५ हजार कृषी ग्राहकांना दिवसा वीज मिळणार आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील ४३ उपकेंद्रांच्या ठिकाणी ७९५ एकर जमिनीवर १५९ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याद्वारे सुमारे ६५ हजार कृषी ग्राहकांना दिवसा वीज मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील २८ उपकेंद्रांच्या ठिकाणी ११५३ एकर जमिनीवर १८६ मेगावाट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. त्यामुळे ५९ हजार कृषी ग्राहकांना दिवसा वीज मिळेल.

वीज चोरीवर अंकुश...

कोल्हापूर परिमंडळात वीज चोरीचे प्रमाण कमी आहे. विद्युत कायदा २००३ कलम १३५ व १३८ अंतर्गत कोल्हापूर परिमंडळात वर्षभरात १२२९ वीज चोरीप्रकरणी ३ कोटी ८५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात ४४२ प्रकरणांत २ कोटी ५० लाख, तर सांगली जिल्ह्यात ७८७ प्रकरणांत १ कोटी ३४ लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

Solar Agriculture Scheme
Kolhapur Sugarcane : कोल्हापूर विभागात ऊस गाळप हंगाम जोमात, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिछाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com