Leopard Attack
Leopard AttackAgrowon

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

Leopard Terror : शेतात वस्ती केलेल्या मेंढपाळांच्या वाड्यावर गुरुवारी (ता. ११) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संस्कृती संजय कोळेकर (वय दीड वर्ष) शिरोली खुर्द (ता. जुन्नर) हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Published on

Pune News : शेतात वस्ती केलेल्या मेंढपाळांच्या वाड्यावर गुरुवारी (ता. ११) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संस्कृती संजय कोळेकर (वय दीड वर्ष) शिरोली खुर्द (ता. जुन्नर) हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संजय कोळेकर हे शिरोली खुर्द येथील पाटील मळावस्तीवरील शेतकऱ्याच्या शेतात वास्तव्यास होते. तेथे ते व त्यांची पत्नी व मुलगी संस्कृती हे झोपलेले होते. संस्कृती दोघांच्या मध्ये होती. मात्र गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास बिबट्या तिला उचलून घेऊन गेला, अशी माहिती पोलिस पाटील विक्रम मोरे यांनी दिली.

Leopard Attack
Leopard Update : राज्यात १ हजार ९८५ बिबट्यांचा अधिवास

या बाबत माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदाप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने जमले होते.

Leopard Attack
Leopard Attack : बिबट्याचा हल्ला!; जुन्नरमध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना

सर्वांनी आजूबाजूच्या शेतात मुलीचा शोध घेतला, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला असता उसाच्या शेतातून बिबट्या इकडून तिकडे पळाला असल्याचे निदर्शनास आले. तसेच एका शेताच्या जवळ मुलीच्या डोक्यातील टोपडे, फ्रॉक आढळून आला. तेथील परिसरातील शेतात शोध घेतला असता वाड्यापासून साधारणपणे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर सुभाष थोरात व विश्‍वास जाधव यांच्या उसाच्या शेताच्या बांधावर मुलीच्या शरीराचे काही अवशेष सापडले.

उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी पंडित थोरात, सागर शिंदे यांच्या पोलिस पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्राप्त अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जुन्नरचे आमदार अतुल बेनके विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष घटनास्थळी पोहोचले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com