Leopard Update : राज्यात १ हजार ९८५ बिबट्यांचा अधिवास

Habitat of leopards : देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १३ हजार ८७४ असल्याचे जाहीर केले आहे.
Leopard
LeopardAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने गुरुवारी (ता.२९) देशातील संरक्षित क्षेत्रांतील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. त्यात मध्यप्रदेशचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.

देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १३ हजार ८७४ असल्याचे जाहीर केले आहे. बिबट प्रगणनेचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला. तो राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था यांनी देशातील विविध राज्यांच्या वन विभागांच्या मदतीने तयार केला आहे.

Leopard
Leopard Rescue : दोन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश

त्यानुसार महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १ हजार ९८५ असल्याचे सांगण्यात आले आहे. २०१८ साली ही संख्या १ हजार ६९० होती. या संख्येत १२२ बिबट्यांची भर पडली आहे. राज्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या एकूण संख्येपैकी जवळपास ७५ टक्के संख्या ही संरक्षित वनक्षेत्राबाहेर राहात असल्याची महत्त्वपूर्ण नोंद अहवालात नमूद आहे.

Leopard
Leopard Attack : पाटणला बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन धोक्यात

विदर्भातील पेंच, बोर, नवेगाव नागझिरा, मेळघाट आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बिबट अधिवासाची घनता २०१८ च्या तुलनेत वाढली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट अधिवासाच्या घनतेमध्ये वाढ झाल्याचेही अहवालात नमूद आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प २०१८ २०२२

बोर ३७ ४५

मेळघाट १८१ २३३

नवेगाव नागझिरा ११६ १४०

पेंच ७० ११२

ताडोबा १२९ १४८

सह्याद्री ८७ १३५

बिबट्यांची संख्या

मध्य प्रदेश ३,९०७

महाराष्ट्र १९८५

कर्नाटक १,८७९

तमिळनाडू १,०७०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com