Aslam Abdul Shanedivan
राज्याच्या विविध जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत
अनेक ठिकाणी गवे, अस्वल आणि बिबट्याचे हल्ले झाल्याचे समोर आले आहेत
यामुळे बिबट्यांचे हल्ले रोखण्यासह तातडीचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी जुन्नर वनविभागाने कंबर कसली आहे
जुन्नर वनविभागाकडून नगदवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्या शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे
नगदवाडी (ता. जुन्नर) हे ऊस पट्टा असून कृती दलाचे पहिले कार्यक्षेत्र येथे करण्यात आले आहे
या बिबट्या शीघ्र कृती दलामुळे जुन्नर वनविभागाच्या पूर्वपट्ट्यातील गावांना फायदा होणार आहे
याबरोबर खेड आणि शिरूर भागांतील नागरीवस्त्यांमध्ये देखील बिबट्या शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात येईल असे माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी म्हटले आहे.