Sangli Market Committee : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवावेत, अशा सूचना याआधीच देण्यात आल्या आहेत. अशा वजनकाट्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास संबंधित बाजार समित्यांवर कायदा व नियमातील तरतुदीनुसार योग्य कारवाई करण्याच्या परिपत्रकीय सूचना पणन संचालक विकास रसाळ यांनी सर्व जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतमाल वजनाबाबत कोणत्याही तक्रारी येणार नाहीत यासाठी दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यात सांगली बाजार समितीसह सात बाजार समित्यांचा समावेश आहे. बहुतांश ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरले जातात; मात्र ते आधुनिक नाहीत तसेच अनेक काट्यांमध्ये त्रुटी असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री विकास व विनियमन नियमनानुसार बाजार समितीने शेतमाल वजनमाप करण्यासाठी वजनकाटे बसविले पाहिजेत आणि ते योग्य त्या चालू स्थितीत ठेवले पाहिजेत. खरेदीदार, विक्रेत्यास बाजार समितीने ठरविलेले शुल्क देऊन आपल्या शेतमालाचे वजनमाप करता येईल. अचूक शेतमाल वजनमापासाठी पणन संचालनालय, शासन, शेतकरी आणि शेतकरी संघटना आग्रही आहेत.
शासनाने पर्यायी बाजार व्यवस्थेबाबत नेमलेल्या अभ्यास गटाच्या अहवालातही शेतमालाचे वजनमाप चोख असण्याचा मुद्दा मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर पणनचे १५ मार्चचे परिपत्रक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बाजार समित्यांमध्ये काही वेळा तीन-चार शेतकऱ्यांचा एकत्रित शेतमाल एका वाहनातून आणला जातो आणि अशा वेळेस अधिकृत वजनकाट्यावर वजन न करता व्यापाऱ्यांकडे असलेल्या छोट्या वजनकाट्यावर वजन करण्यास सांगण्यात येते.
बाहेरील किंवा व्यापाऱ्यांच्या वजनकाट्यावर वजन केल्यामुळे शेतमालाच्या वजनात तफावत आढळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी पणन संचालनालयास प्राप्त होत आहेत. शिवाय वजन तफावतीमुळे बाजार समितीची बाजार फी व शासनाच्या देखभाल फीचेही नुकसान होते. पर्याय बाजार व्यवस्थेच्या अभ्यास गटाने सुचविला होता.
हे लक्षात घ्यायला हवे...
अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर शेतमाल वजनमाप करा
शेतमाल वजन करण्याच्या दरापेक्षा शेतकऱ्यांना जादा दर आकारणी नको
वजनाची पावती बाजार समितीच्या दप्तरी ठेवून सेस पडताळणीस लाभ
शेतमाल वजन तफावतीने शेतकऱ्यांसह बाजार समिती व शासनाचेही नुकसान
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.