Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Kharif Season : खरीप हंगामाच्या सुरुवातीला याच भागातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत एचटीबीटीचा पुरवठा होतो.
Illegal Seeds
Illegal SeedsAgrowon

Nagpur News : गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध प्रदेशच्या सीमावर्तीय भागातून दर वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनधिकृत एचटीबीटीचा शिरकाव होतो. त्या पार्श्‍वभूमीवर नागपूर विभागीय गुणनियंत्रण पथकाकडून खरबदारीच्या उपायाअंतर्गंत प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. या भागात तालुका तसेच जिल्हास्तरीय विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून निगराणी केली जात आहे.

गोंदियाची सीमा मध्य प्रदेशशी जुळलेली आहे. त्यासोबतच चंद्रपूर, गडचिरोलीच्या सीमा या आंधप्रदेश व तेलंगणा राज्याशी कनेक्‍ट आहेत. खरीप हंगामाच्या सुरुवातीला याच भागातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत एचटीबीटीचा पुरवठा होतो.

Illegal Seeds
Illegal Cotton Seeds : खानदेशात अवैध कापूस बियाणे होऊ लागले दाखल

एचटीबीटीची लागवड देखील याच भागात मोठ्या क्षेत्रावर होत असल्याचे वास्तव आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा अशाप्रकारच्या अनधिकृत बियाण्यांचा शिरकाव रोखण्यासाठी नागपूर विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनात पथकाचे अध्यक्ष तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संदीप पवार हे प्रयत्नशील आहेत. त्या अंतर्गंत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा, राजूरा या तालुक्ं‍यातील सीमावर्ती गावांमध्ये पाहणी करण्यात आली.

तालुका तसेच जिल्हास्तरीय पथकाकडून देखील सीमावर्ती भागात निगराणी होत आहे. अशा प्रकारच्या उपायातून यंदा एचटीबिटीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. पथकाने हंगामात पहिलीच कारवाई करीत तब्बल पावणेदहा लाख रुपयांचे बियाणे मूल येथे जप्त केले. या कारवाईमुळे अवैध बिटीधारकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी या पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे.

Illegal Seeds
Cotton Seed Sales : खानदेशात कापूस बियाणे विक्री १५ मे पासून
अनधिकृत बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्याची उगवण न झाल्यास दादही मागता येत नाही. त्यासोबतच पर्यावरणीय धोका पण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अशा बियाण्यांच्या नियंत्रणासाठी भरारी पथकाद्वारे तपासणीवर भर दिला आहे. वनविभागाचे चेकपोस्ट आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील स्वतंत्र तपासणी होईल.
शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर

नऊ लाखांचे एचटीबीटी जप्त

विशेष पथकाकडून एचटीबीटीचा शिरकाव रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील जुनासुर्ला येथे एका व्यक्‍तीकडून तब्बल ९ लाख ४८ हजार रुपयांचे एचटीबीटी जप्त केले.

संबंधित व्यक्‍ती हा आंध्र प्रदेशातील असून भाडेतत्वावर शेती घेत त्या ठिकाणी अवैध बियाण्यांची लागवड करण्यावर भर दिला जात होता. पथकाच्या सतर्कतेने या प्रकाराचा भंडाफोड झाला. आता गेल्या चार दिवसांपासून सीमावर्ती भागात तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जात असल्याचे विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संदीप पवार यांनी सांगीतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com