Kharif Season 2024 : ‘वनामकृवि’च्या खरीप बियाणे विक्रीचा शनिवारी प्रारंभ

VNMKV Parbhani : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. १८) विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित खरिपाच्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी पिकांच्या बियाणे विक्रीचा प्रारंभ होणार आहे.
VNMKV Parbhani
VNMKV ParbhaniAgrowon
Published on
Updated on

Seed Supply : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. १८) विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित खरिपाच्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी पिकांच्या बियाणे विक्रीचा प्रारंभ होणार आहे.

VNMKV Parbhani
Kharif Season 2024 : खरीप हंगामासाठी भरारी पथकांची नियुक्ती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विविध ठिकाणांच्या प्रक्षेत्रावर २०२३ च्या खरीप हंगामात उत्पादित सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी या पीकांचे १ हजार १०० क्विंटल बियाणे विक्रीस उपलब्ध झाले आहे.

त्यात सोयाबीनचे एमएयूएस-१६२, एमएयूएस-१५८, एमएयूएस-७१, एमएयूएस-६१२ या वाणांचे बियाणे २६ किलो वजनाच्या पिशवीमध्ये तर एमएयूएस- ७२५ या वाणाचे बियाणे ५ किलो वजनाच्या पिशविमध्ये उपलब्ध आहे.

एमएयूएस-१६२ वाणाच्या १००० पिशव्या, एमएयूएस-१५८ वाणाच्या १५०० पिशव्या, एमएयूएस-७१वाणाच्या १७५ पिशव्या, एमएयूएस-६१२ वाणाच्या १००० पिशव्या, एमएयूएस- ७२५ वाणाच्या १६०० पिशव्या उपलब्ध आहेत. तुरीचे बीडीएन-७१६ (लाल) व बीडीएन-७११ (पांढरी) या वाणाचे ६ किलो वजनाच्या पिशवीमध्ये, तर बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरा) या वाणाचे ६ आणि २ किलो वजनाच्या पिशवीमध्ये उपलब्ध आहे.

बीडीएन-७१६ (लाल) वाणाच्या प्रत्येकी ६ किलो वजनाच्या ८०० पिशव्या,बीडीएन-७११ (पांढरा) वाणाच्या प्रत्येकी ६ किलो वजनाच्या ३६६ पिशव्या, बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरा) वाणाच्या ६ किलो वजनाच्या ७०० पिशव्या व २ किलो वजनाच्या ३०० पिशव्या उपलब्ध आहेत. मुगाच्या बीएम -२००३-२ या वाणाच्या ६ किलो वजनाच्या २१६ पिशव्या उपलब्ध आहेत.

ज्वारीच्या परभणी शक्ती वाणाच्या बियाण्याच्या ४ किलो वजनाच्या ३०० पिशव्या उपलब्ध आहेत. बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम स्वीकारण्यात येईल तसेच एका व्यक्तीस एक बियाणे पिशवी याप्रमाणे विक्री करण्यात येईल असे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

पीकनिहाय प्रतिकिलो
बियाणे दर स्थिती
पीक वाण... बियाणे दर
सोयाबीन...१०० रुपये
तूर...२५० रुपये
मूग...२२० रुपये
ज्वारी...१२५ रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com