Agrowon Anniversary: वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून ‘अॅग्रोवन’वर शुभेच्छांचा वर्षाव!

20 Years of Agrowon: शेतीचा मार्गदर्शक आणि शेतकऱ्यांचा विश्वासू साथी ‘अॅग्रोवन’ने आपल्या यशस्वी प्रवासात २० वर्षे पूर्ण केली आहेत. राज्यभरातून कृषी क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी आणि अधिकारी यांनी अॅग्रोवनला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Agrowon
AgrowonAgrowon
Published on
Updated on

Pune News: द्विदशकांची यशस्वी वाटचाल करणाऱ्या दैनिक ‘अॅग्रोवन’वर महाराष्ट्रभरातून विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यातील शेतकरी, नागरिक, कृषी शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी अॅग्रोवनविषयी भरभरून या प्रतिक्रियांमधून व्यक्त झाले आहेत.

कृषी विद्यापीठांच्या तंत्रज्ञान प्रसाराचा साथी

शेतकऱ्यांपर्यंत कृषी विद्यापीठांचे सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी अॅग्रोवन हे व्यासपीठ ठरले आहे. अतिशय उत्कृष्टपणे, व्यवस्थितपणे हे दैनिक गेली २० वर्षे अखंडपणे निघते आहे. वाचक म्हणून याचा सार्थ अभिमान आहे.

डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, पंदेकृवि, अकोला

अॅग्रोवन माझ्या कुटुंबाचा सदस्य

मी अॅग्रोवनच्या पहिल्या अंकापासूनचा वाचक आहे. मी, माझी पत्नी व अॅग्रोवन असे माझे कुटुंब मानतो. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला ॲग्रोवन वाचनातून शिकलो. जीवनात यश, अपयश सहन करण्याची शक्ती त्यातूनच मिळाली. सहज समजेल, उमजेल अशी भाषा, मांडणी असल्याने अॅग्रोवन आज सर्वदूर प्रसिद्ध झाला आहे.

गणेश नानोटे, प्रगतिशील शेतकरी, निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

Agrowon
Agriculture Success Story: तामशीने मिळवली प्रगतिशील शेतीत ओळख

सकारात्मक बदल घडवले

अ‍ॅग्रोवन दैनिकाने शेतकरी, शास्त्रज्ञ आणि समाजातही सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. अ‍ॅग्रोवन परिवारातील अनेकांनी आजवर अनेकवेळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भेटी दिल्या आहेत. अ‍ॅग्रोवन २१ व्या वर्षात प्रवेश करीत आहे. त्यानिमित्तीने अॅग्रोवनला शुभेच्छा !

डॉ. बी. बी. भोसले, कीटकशास्त्रज्ञ, तथा माजी विस्तार शिक्षण संचालक, वनामकृवि, परभणी

ज्ञान, कौशल्याचा सागर

हळद लागवडीचा वसमत पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात ॲग्रोवनमुळे पोहोचला. यामध्ये कृषी विद्यापीठ, वसमत तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी, अधिकारी कर्मचारी आणि अॅग्रोवनचा मोलाचा वाटा आहे. अॅग्रोवन वाचनातून माहिती, ज्ञान व कौशल्यांमध्ये कायम भर पडते. शेतकरी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कृषिविषयक नवीन माहिती, ज्ञान, यशोगाथा, योजनांची सविस्तर माहिती ॲग्रोवनमधून दररोज मिळते.

डी. बी. काळे,निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी, परभणी

ॲग्रोवनमुळे मिळाली वेगळी ओळख

शेती आणि शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडवणारे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन अचूक मार्गदर्शन, अभ्यासू शेतकरी संशोधक अधिकारी अशा सर्वांचे व्यासपीठ म्हणजे दैनिक ॲग्रोवन. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी साक्षर करणारे, हळदीमध्ये नवक्रांती घडविणारे देवदूत ॲग्रोवनच्या माध्यमातून मिळाले. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतातील बांधावरील प्रयोगांची माहिती प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना वेगळी ओळख ॲग्रोवन निर्माण करून दिली.

पंकज अडकिणे, प्रगतिशील शेतकरी, डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली

Agrowon
Dairy Farming Success Story: दुष्काळी पट्ट्यात तरुणाचा आदर्श दुग्ध व्यवसाय

शेती समस्या सोडविण्यात अग्रेसर

राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान नेण्याचे मोठे काम अॅग्रोवनमुळे झाले. चारही कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील संशोधन राज्यात चौफेर करण्याचे कार्य ॲग्रोवनने केले. मागील २० वर्षांत शेती पिकामध्ये विविध समस्या शेतकऱ्यांना आल्या. मात्र त्या सोडविण्यासाठी ॲग्रोवनचा मोठा हातभार आहे. शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञ यांना मोठे व्यासपीठ मिळाले. यामुळे प्रत्येकास आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली.

- रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर

अ‍ॅग्रोवनच्या वाटचालीस मानाचा मुजरा

कृषी विषयावर समर्पित असलेले अॅग्रोवन हे दैनिक आज आपल्या २१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या गौरवशाली क्षणी, महाराष्ट्रातील संपूर्ण कृषी क्षेत्रातर्फे विशेष करून आमच्या साखर उद्येागातील सर्व घटकाकडून त्यांना मन:पूर्वक अभिनंदन, कौतुक आणि कृतज्ञता!

महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात दररोज सकाळी नियमितपणे पोहोचणारे हे वृत्तपत्र अत्यंत व्यावसायिक पद्धतीने, पण संपूर्णतः शेतकरीहितासाठी चालवले जाते. कृषी उत्पादन, बाजारभाव, यांत्रिकीकरण, नवनवीन तंत्रज्ञान, नवे पीक वाण, रोग-कीड व्यवस्थापन, हवामान अंदाज, मॉन्सूनचे भाकीत तसेच विविध तज्ज्ञांचे लेख अ‍ॅग्रोवनच्या अंकात शेतकऱ्यांसाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट समाविष्ट असते. हे वृत्तपत्र म्हणजे जणू एक कृषी ज्ञानकोशच मानले पाहिजे. आजवरच्या प्रवासात अ‍ॅग्रोवनने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना शाश्वत उपाय सुचवले. शेतीला नवे दृष्टिकोन दिले आणि आधुनिकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणादिली.

- पी. जी. मेढे, साखर उद्योग अभ्यासक, कोल्हापूर

नवचैतन्य देणारे ॲग्रोवन

शेतीमध्ये विविध माध्यमांतून माहितीचा भडीमार होत आहे. त्यामुळे नक्की कुणावर विश्वास ठेवावा हा नेहमीच प्रश्न पडतो. परंतु ॲग्रोवनमधून योग्य माहिती मिळते. त्यामुळेच हे दैनिक विश्वासास पात्र ठरले. शेतकऱ्यांना आयुष्यात खऱ्या अर्थाने ॲग्रोवनमुळे नवचैतन्य आले.

- प्रकाश पुप्पलवार, शेतकरी, पांढरकवडा, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com