Assembly Elections 2024 : गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर अनेक उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; चंद्रकांत पाटील, भुजबळ, आदित्य ठाकरे, मुंडे यांच्यासह अनेकांचे शक्तिप्रदर्शन

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यादरम्यान राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केले.
Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केले. चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, जयंत पाटील शक्तिप्रदर्शन केले. तर मनसेच्या अविनाश जाधव आणि राजू पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत भरला. दरम्यान अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाचे अनेक दिग्गज नेते आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बाहेर पडले आहेत. यादरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत बीडच्या परळी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. अजित पवार गटात बंडखोरी झाली असून आभा पांडे यांनी पूर्व नागपूरतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे 'दादा' च्या लाडक्या बहिकडून महाराष्ट्रातील पहिली बंडखोरी केल्याची चर्चा आता राज्यभर होत आहे.

Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Election : आदर्श आचारसंहिता पालनासाठी दक्ष राहावे

मनसेकडून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव

दरम्यान महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून कल्याण येथून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तर स्वत: राज ठाकरे यावेळी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते.

चंद्रकांत पाटील यांचे शक्तिप्रदर्शन

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी रोहिणी खडसे यांना टोला लगावताना त्यांना अद्याप एबी फॉर्म मिळाला मिळाला नाही, असे म्हटले आहे.

चंद्रकांतदादांचे शक्तिप्रदर्शन

मी कोथरूडचा कोथरूड माझं, असा रथ असलेल्या रॅलीतून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी यावेळी केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने महायुती आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंगोलीत बांगर यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार संतोष बांगर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी बांगर यांनी कळमनुरी मतदारसंघात मोठे शक्ती प्रदर्शन केले. मतदार संघातील लाखो नागरिकांना सोबत घेत त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते.

Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी उमेदवार कोण असेल याकडे लक्ष

भाजप उमेदवार गावित यांनी भरला उमेदवारी अर्ज

नंदुरबार जिल्ह्यात देखील आज विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी उसळली होती. यावेळी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच उमेदवारी अर्ज दाखल केला.

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज

इंदापुरात देखील यंदा तिरंगी लढत होणार आहे. येथे विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातील प्रवीण माने यांनी बंडखोरी केली आहे. अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दंड थोपाटले आहेत. आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बाईक रॅली तसेच जोरदार शक्ती प्रदर्शन करीत हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

कवठेमहाकाळमध्ये जोरदार लढत

कवठेमहाकाळमधून शरद पवार गटातील रोहित पाटील यांच्याविरोधात अजित पवार गटाचे संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याआधी रोहित पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच अर्ज भरल्यानंतर सभा घेतली.

जयंत पाटील यांचा अर्ज भरताना रेकॉर्ड गर्दी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उरण-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी रेकॉर्ड प्रचंड गर्दी जमली होती.

कोल्हापुरात अंडरकरंट फाईट

कागल विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातून समरजीत घाटगे यांनी अर्ज भरला. ते येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात घाटगे मैदानात उतरले आहेत. यामुळे येथे कांटेकी टक्कर होणार असे बोलले जात आहे. तर कोल्हापूर दक्षिणमध्ये देखील भाजपकडून माजी आमदार अमर महाडिक आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्यात थेट लढत होईल. आज काँग्रेसकडून आमदार ऋतुराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपकडून महाडिक यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com