
Pune News: देलवडी (ता. दौंड) येथील युवा शेतकरी सुनील शेलार यांनी १४ गुंठे क्षेत्रामध्ये ठिबकच्या साह्याने उन्हाळी भेंडी पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. ठिबकद्वारे रासायनिक खते सोडल्याने पीक जोमदार बहरले व उत्पादनात वाढ झाली. सध्या दिवसाआड भेंडीचा तोडा निघत आहे. १० ते १२ क्रेट भेंडीचे पीक प्रतवारीनुसार निवड करून बाजारपेठेत पाठवले जाते. त्यास प्रतिकिलो ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळत आहे.
सुनील शेलार हे भेंडी चंदननगर तसेच इतर बाजारपेठांमध्ये विक्री करत आहे. या पिका शिवाय शेलार यांनी नियमित उसाव्यतिरिक्त मिरचीचेही पीक घेतले आहे. भेंडी पिकाला मावा व बुरशी या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आलटून पालटून जंतुनाशके फवारण्यात आली. कुटुंबीय व मजूर महिलांच्या साह्याने पिकाची दोन वेळा खुरपणी करण्यात आली. एक एप्रिलपासून भेंडी पिकाचा पहिला तोडा सुरू झाला.
..अशी केली लागवड
फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतीची मशागत केली.
शेतीची नांगरट करून त्यामध्ये दोन ट्रॉली घरचे शेणखत टाकले.
साडेसात फुटावरती पट्टा पद्धतीने सरी काढली.
शेतीमध्ये २० हजार रुपये खर्चून ठिबक सिंचनचे बेड अंथरले.
स्वतःच्या कूपनलिकेचे पाणी भेंडी पिकासाठी वापरले.
ठिबक पाइपच्या दोन्ही बाजूला सव्वा फूट अंतरावर भेंडीच्या बियाणांची टोपण केली.
लुसलुशीत भेंडीला ग्राहकांची पसंती
प्रशिक्षित मजूर व कुटुंबीयांकडून दिवसाआड तोडणी केली जाते. या कामी शेलार यांना वडील रामचंद्र शेलार, आई रतन व पत्नी दीपाली यांचे सहकार्य मिळते. भेंडी तोडताना हाताला जखम होऊ नये म्हणून हातात हातमोजे व पायामध्ये बूट घातले जातात. लुसलुशीत भेंडीला बाजारपेठेमध्ये ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे, असे सुनील शेलार यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.