
Pune News: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात (स्मार्ट) खरेदीसाठी आलेला निधी हडप केल्याचे उघड झाले होते. आता या घोटाळ्यातील रकमांची वसुली करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.
‘स्मार्ट’ प्रकल्पातील कामांचे लेखा परीक्षण करताना काही जिल्ह्यांत त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यात अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. अकोल्यातील अधिकाऱ्यांकडून एकूण २८ लाख ५६ हजार ९६० रुपये इतकी रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वसूलपात्र रक्कम २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षांतील आहे. लेखापरीक्षण अहवालात घेण्यात आलेल्या आक्षेप बाबींशी संबंधित ही रक्कम असल्याचे सांगितले जात आहे.
अकोला जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पात कार्यरत असलेल्या तत्कालीन अधिकाऱ्याने मनमानी पद्धतीने खरेदीचे व्यवहार केल्याचा संशय होता. लेखा परीक्षणात या गोंधळावर प्रकाश पडला. प्रकल्पाच्या लेखा परीक्षणातून आर्थिक अनियमिततेची अनेक प्रकरणे समोर आल्याचे बोलले जात आहे.
अधिकाऱ्यांनी स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी करताना मनमानी पद्धतीने कारभार केला होता. या कारभाराला वेळीच चाप लावणे गरजेचे होते. मात्र नियंत्रणाबाहेरील हा कारभार चालला होता. शासकीय निधीची उधळपट्टी झाल्याने निधीच्या वसुलीचे आदेश पुणे येथील प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने दिले आहेत. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून या रकमेची तातडीने वसूल करावी, वसूल रक्कम सरकारी खात्यात जमा करावी, असे संबंधित कार्यालयांना सांगण्यातआले आहे.
घोटाळ्यातील रकमेबाबत आधी खुलासे मागविले होते. परंतु, एकही खुलासा योग्य न वाटल्याने रकमा वसूलपात्र ठरविण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या संदर्भात अकोला येथील ‘स्मार्ट’च्या अधिकाऱ्यांना अनुपालन अहवालासह भरणा पावत्या प्रकल्प कार्यालयास सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात प्रकल्प राबवलेल्या इतरही जिल्ह्यांत अशा प्रकारे काही ठिकाणी निधी वसुलीची प्रकरणे असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.