Value Chain : टीसीआयकडून हवामान बदल अनुकूल शेतमालाच्या मूल्यसाखळीसाठी नव्या प्रकल्पाची घोषणा

Climate Resilience : प्रामुख्याने भरडधान्य टोमॅटो, डाळी आणि सोयाबीन पिकावर लक्ष केंद्रित करून या पिकांच्या मूल्यसाखळीतील अडचणी सोडवण्यासाठी उपाय सुचवले जाणार आहेत.
Value Chain
Value ChainAgrowon
Published on
Updated on

Tata-Cornell : टाटा-कॉर्नेल इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड न्यूट्रिशन (टीसीआय) संस्थेने 'हवामान बदल अनुकूल पोषण आहार मूल्यसाखळी संवर्धन' या प्रकल्पाची घोषणा केली आहे. टीसीआयच्या या प्रकल्पामध्ये फळ-भाज्या, कडधान्य आणि तेलबिया यासारख्या पिकांच्या मूल्यसाखळीचा अभ्यास करण्यात येणार आहे. प्रामुख्याने भरडधान्य, टोमॅटो, डाळी आणि सोयाबीन पिकावर लक्ष केंद्रित करून या पिकांच्या मूल्यसाखळीतील अडचणी सोडवण्यासाठी उपाय सुचवले जाणार आहेत.

या प्रकल्पाच्या अंतर्गत धोरणकर्ते, शास्त्रज्ञ आणि नागरी संस्थांसह विविध भागधारकांशी चर्चा करण्यात येईल. या चर्चेतून उपायांची दिशा आणि उपयुक्तता ठरवली जाईल, असं टीसीआयच्या संशोधकांनी सांगतात.

प्रकल्पासाठी नोव्हो नॉर्डिस्क फाउंडेशनने टीसीआयकडून ५ दशलक्ष डॅनिश क्रोनरचा आर्थिक निधी दिला आहे. मजबूत मूल्यसाखळी शेतकऱ्यांना बाजाराशी जोडून ठेवते. तसेच दर ठरवण्यास मदत करते. आवश्यक पायाभूत सुविधांची त्यामधून निर्मिती होते, त्यामुळे या प्रकरच्या मूल्यसाखळीची गरज संशोधक व्यक्त करतात.

Value Chain
Spice Crop Value Addition : मसाला पिकांच्या मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा

भारतातील कुपोषण दर कमी करण्यासह हवामान बदल अनुकूल अन्न प्रणाली निर्मितीसाठी विविधिकरण गरजेचं आहे. परंतु अन्नधान्य पिकांव्यतिरिक्त अन्य पिकांची मूल्यसाखळी मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचं टीसीआयच्या संशोधकांचं मत आहे.

देशात विविध शेतीमालाची मूल्यसाखळी अद्यापही विकसित झालेली नाही. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक कमकुवत होऊ लागली आहे. मूल्यसाखळीमध्ये प्रत्येक टप्प्यावर अन्नाचं मूल्यवर्धन होतं. तसेच अन्नाची टिकवण क्षमता सुधारते.

शेतीपासून ते ग्राहकांच्या ताटापर्यंत अन्न पोहचवण्यासाठी विविध प्रक्रियांमधून मूल्यवर्धन करावं लागतं. यामध्ये उत्पादन, प्रक्रिया, वितरण, विपणन आणि वापर या टप्प्यांचा समावेश असतो. त्यामुळे अन्नधान्य पीक वगळता अन्य पिकांची मूल्यसाखळी विकसित करणं गरजेचं असल्याचं टीसीआयचे संशोधक सांगतात.

“शेतातून ताटापर्यंत अन्न पोहोचताना कार्यक्षमतेत वाढ, अपव्ययात घट आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक संधी निर्माण करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. हा नवा प्रकल्प त्या संधी ओळखून, पोषणक्षम आणि हवामान-साक्षर पिकांसाठीच्या मूल्यसाखळी बळकट करण्यासाठी धोरणकर्त्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देईल.”
प्रभू पिंगळी संचालक, टीसीआय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com