Agriculture Laboratory : अकोला जिल्ह्यातही आता बांधावरील प्रयोग शाळा

Agriculture News : शेजारच्या वाशीम जिल्ह्यात बांधावरील प्रयोगशाळेचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरतो आहे. आता अकोला जिल्ह्यातही याची सुरुवात झाली आहे.
Agriculture Laboratory
Agriculture Laboratory Agrowon

Akola News : शेजारच्या वाशीम जिल्ह्यात बांधावरील प्रयोगशाळेचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरतो आहे. आता अकोला जिल्ह्यातही याची सुरुवात झाली आहे. राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेअंतर्गत अकोट तालुक्यातील मिर्झापूर येथील एकता शेतकरी उत्पादक गटाने अशा प्रकारची शेत बांधावरील जैविक निविष्ठा निर्मिती प्रयोगशाळा सुरू केली. या प्रयोगशाळेचे उद्‌घाटन बुधवारी (ता. २७) झाले.

तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचे २०२२ चे तालुकास्तरीय विजेतेपद ते शेतीला लागणारी जैविक निविष्ठा स्वतः निर्माण करण्यासाठी उभारलेली शेत बांधावरील प्रयोगशाळा असा हा प्रवास या गटाने पूर्ण केला आहे.

कृषी विभागाच्या माध्यमातून आणि तालुका कृषी अधिकारी श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनात गटातील सदस्यांनी एरंडा (जि. वाशीम) येथील प्रयोगशाळा व अकोला कृषी विज्ञान केंद्रात जैविक निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. याला कृषी विभागाच्या माध्यमातून शासकीय योजनेची जोड मिळाली आणि गटाच्या प्रयत्नांना यश आले.

Agriculture Laboratory
Agriculture Technology : जंगलप्रवण, दुर्गम भागात तंत्रज्ञानयुक्त यशस्वी शेती

गटाने गावातच शेत बांधावर ही निविष्ठा निर्मितीची प्रयोगशाळा उभारली. कृषी विभागाच्या सहकार्याने आमच्या स्वप्नांचा पहिला टप्पा आम्हाला पूर्ण करता आला असे मत उद्‌घाटन प्रसंगी प्रास्ताविकामध्ये एकता शेतकरी उत्पादक गटाचे रवींद्र खापरे यांनी व्यक्त केले.

तालुका कृषी अधिकारी श्री. शिंदे यांनी गटाच्या कामगिरीचे कौतुक करीत भविष्यात जैविक निविष्ठेचा शेतकऱ्यांनी वापर वाढवावा आणि उत्पादन खर्च कमी होऊन, उत्पादकता वाढावी, तसेच जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

Agriculture Laboratory
Agricultural Pump Seized : पाचोरा केटी वेअर बंधाऱ्यातून शेतीपंप जप्त

या जैविक निविष्ठा निर्मिती प्रयोगशाळेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना जैविक निविष्ठा उपलब्ध होईल आणि येणाऱ्या काळात याचा वापर देखील वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी कृषी पर्यवेक्षक अनंत देशमुख, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी गणेश निगुडे, कृषी पर्यवेक्षक अनिस देशमुख, कृषी सहायक सुकेशनी करवते, रवी पातळे, शुभांगी खंडारे, पुंडा येथील रॉयल शेतकरी उत्पादक गटाचे विजय कुलट, रंभापूरच्या शिवनेरी शेतकरी उत्पादक गटाचे रवींद्र गिते, जय गजानन शेतकरी उत्पादक गटाचे नरेश रावणकार (कवठा बुद्रुक) उपस्थित होते.

गटाचे सदस्य उमेश सपकाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रयोगशाळा निर्मितीसाठी रवींद्र खापरे, मनोज वानकर, उमेश सपकाळ, नंदकिशोर सपकाळ, शिवकुमार गणेशराव सपकाळ, शिवकुमार दामोदर सपकाळ, अविनाश खापरे, सूरज सावरकर, अतुल पुंडकर, अतुल खापरे, श्रीराम सावरकर, पंजाबराव सपकाळ, अभिजित सपकाळ यांनी पुढाकार घेतला. जीवन गावंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com