Jalgaon News : पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर टाइप केटी बंधाऱ्यातून पाणी चोरी करणारे वीस पंप पालिका गस्ती पथकाने जप्त केले. यामुळे शेतीपंपधारकांत मात्र नाराजी आहे. कारण पिकांचे सिंचन व अन्य कार्यवाही सुरू असताना पंप जप्त केल्याने अडचण वाढली आहे.
पाचोरा पालिका पथकाच्या या कामगिरीमुळे मात्र पाणी चोरी नियंत्रणात आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. शेतीपंप मालकांवर फौजदारी कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली. याबाबतही शेतकरी अन्य मंडळीत रोष आहे. गिरणा नदी पात्रात ओझर (ता. पाचोरा) गावाजवळ बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाइप बंधाऱ्यातून पालिकेमार्फत शहराला पाणीपुरवठा केला जातो.
गिरणा धरणातून सोडलेले आवर्तनाचे पाणी बंधाऱ्यात अडवून पाणीपुरवठा केला जात असला तरी एका आवर्तनाचे पाणी किमान तीन महिने पुरावे असा संकेत आहे. परंतु पाचोरा, भडगाव तालुक्यांतील अनेक शेतकरी पाण्याचे संकट असल्याने बंधाऱ्यातून पाणी उपसा करतात. या उपशाला मान्यतेची आवश्यकता, असे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कारण जसा नागरिकांचा पाण्यावर हक्क आहे, तसा हक्क शेतीचा व शेतकऱ्यांचाही आहे. पिकांनाही पाणी हवे आहे. अवघ्या महिनाभरात आवर्तनाचे पाणी संपून केटी बंधारा कोरडाठाक होण्याचे प्रकार होतात. उन्हाची वाढती तीव्रता आणि पाणी पुरविण्याचे आव्हान लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेत पाणी चोरावर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशाची अंमलबजावणी करताना पालिकेने केटी बंधाऱ्यातून पाणी चोरी करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाने बंधाऱ्यात वीजपंप टाकून पाणी चोरी करणारे सुमारे २० शेतीपंप मागील काही दिवसांत जप्त केले. परंतु यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी जशी पालिकेची आहे, तशी शेतकऱ्यांची देखील आहे, असाही मुद्दा आता उपस्थित केला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.