Cotton Module Technology : कापसातील कचरा रोखणार मॉड्यूल तंत्रज्ञान

Dr. S.K. Shukla : कापूस मॉड्यूलचे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सिरकॉटचे (सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्‍नॉलॉजी) संचालक डॉ. एस. के. शुक्‍ला यांनी दिली.
Dr. S.K. Shukla
Dr. S.K. Shukla Agrowon

Nagpur News : कापूस साठवणुकीच्या अपेक्षित संसाधनांची वाणवा असल्याने शेतकऱ्यांकडील कापसात मोठ्या प्रमाणावर कचरा मिसळतो. प्रक्रियेदरम्यान प्लॅस्टिकसह केस व इतर कचरा वेगळा करण्याचे आव्हान निर्माण होते.

ही बाब लक्षात घेता अमेरिकेसह प्रगत देशात असलेल्या कापूस मॉड्यूलचे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सिरकॉटचे (सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्‍नॉलॉजी) संचालक डॉ. एस. के. शुक्‍ला यांनी दिली.

कापूस वेचणीनंतर शेतात, त्यानंतर तो घरी आणला जातो. तेथून प्रक्रियेकामी मिळेल त्या वाहनाने जिनिंगपर्यंत आणण्यावर भर राहतो.

दरम्यान दरातील घसरण त्यासोबतच इतर विविध कारणांमुळे हंगाम संपल्यानंतर वर्ष, दोन वर्षे कापूस साठवला जातो. परंतु साठवणुकीसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत नसल्याने त्यात प्लॅस्टिक पाऊच, केस व इतर कचरा मिसळतो.

Dr. S.K. Shukla
Cotton Planting Technology : सघन लागवड तंत्रज्ञानाने कापूस उत्पादकतेमध्ये वाढ शक्य

जिनिंग, प्रेसिंग व त्यानंतर गाठ बांधताना हे घटक वेगळे करणे आव्हानात्मक ठरते. यातील कचऱ्याचा एकही घटक गाठ बांधतांना त्यात राहिल्यास कापूस गाठीच्या दर्जावर परिणाम होतो.

ही बाब लक्षात घेता प्रगत कापूस उत्पादक देशातील मॉड्यूल तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत.

Dr. S.K. Shukla
Cotton Production : गुलाबी बोंड अळीमुळे १५० लाख गाठींचे नुकसान

अमेरिकेसह प्रगत देशात

डॉ. एस. के. शुक्‍ला यांच्या माहितीनुसार, अमेरिकेसह प्रगत राष्ट्रांमध्ये कापूस वेचणीनंतर शेतातच त्याचे प्रेसिंग केले जाते. असा कापूस नंतर उपलब्ध दोराच्या साहाय्याने बांधला जातो. त्याकरिता स्टील पट्ट्यांचाही वापर होतो.

अमेरिकन शेतकऱ्यांचे कापसाखालील क्षेत्र मोठे राहते. परिणामी, त्या ठिकाणी अशाप्रकारे प्रेसिंग केलेल्या कापसाचे बंडल सरासरी पाच टन राहते. त्याला शेतातून इतर ठिकाणी हलविण्याकरिता खास संयंत्राचा वापर होतो. अशा प्रेसिंग केलेल्या कापसात कचरा मिसळण्याची भीती राहत नाही व कापसाचा दर्जा राखता येतो.

अमेरिकन कॉटन मॉड्यूल हे पाच टन असले तरी भारतीय शेतकऱ्यांकडे जमीनधारणा कमी आहे. परिणामी साधारणतः तीस किलोचे मॉड्यूल असावे असा विचार आहे. तीस किलोचे मॉड्यूल असल्यास ते हाताळणे सहज शक्‍य होईल.

त्याकरिता लागणारी प्रेसिंग यंत्रणा व इतर बाबींवर संस्था काम करीत आहे. सध्या देशात कापसात मिसळणाऱ्या प्लॅस्टिकला वेगळे करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे कापसाची प्रत बिघडते, त्यावर हा उपाय परिणामकारक ठरणार आहे.

डॉ. एस. के. शुक्‍ला, संचालक, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com