Groundnut Loss: ‘भुईमूग शेंगाच नाही, तर आमचे स्वप्न वाहून गेले’

Manora Market Update: मानोरा बाजार समितीत भुईमूग शेंगा पावसामुळे वाहून गेल्या, ज्यामुळे शेतकरी इंदल पवार यांचे वर्षभराचे स्वप्न अखेरला गेले. शेतकऱ्याने शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
Manora Farmer Loss
Manora Farmer LossAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: ‘‘भुईमूगच नाही, तर आमच्या कुटुंबाचे वर्षभराचे स्वप्नसुद्धा वाहून गेले,’’ अशा शब्दांत पाणावलेल्या डोळ्यांनी बारवा (ता. मानोरा) येथील इंदल पवार या शेतकऱ्याने आपली व्यथा व्यक्त केली. इंदल पवार यांचा मुलगा गौरव यांनी मानोरा बाजार समितीत गुरुवारी (ता.१५) भुईमूग विक्रीसाठी आणले होते. या वेळी अचानक आलेल्या पावसात त्यांच्या भुईमूग शेंगा वाहून गेल्या. या विषयावर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

घरी अठरा विश्व दारिद्र्य आणि उपजीविकेसाठी पाच एकर शेती हेच एकमेव साधन. यंदा त्यांनी तीन एकरांत भुईमूग पेरला होता. मात्र नैसर्गिक संकटाने एकरी दीड क्विंटल एवढी उत्पादकता मिळाली. यापैकी एका ट्रॅक्टर भरून भुईमूग त्यांनी मानोरा बाजार समितीत विक्रीला आणला होता. बाजार समिती यार्डात टीन शेड लहान असल्याने त्यांनी भुईमूग शेंग आवारात उघड्यावर टाकली होती. मात्र शेंगेची विक्री होण्याआधीच अचानक पावसाला सुरुवात झाली.

Manora Farmer Loss
Groundnut Yield Drop : भुईमूग उत्पादनाला तापमान वाढीचा फटका

पावसाचा जोर इतका होता की ६० ते ७० टक्के भुईमूग पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेला. गौरव याने वाहून जाणाऱ्या शेंगा वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्याला यश आले नाही. एक क्विंटलपर्यंत भुईमूग वाहून गेला. तसेच उर्वरित भुईमूगही भिजल्याने विक्री झाली नाही. बाजार समितीमध्ये उपस्थित अनेकांनी या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले, परंतु एकजणही गौरव यांच्या मदतीला आला नाही. झालेल्या नुकसानीची दखल घेत बाजार समिती प्रशासन व शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी या कुटुंबीयांनी केली आहे.

पवार कुटुंबामध्ये आजोबा तुळशीराम मोहन पवार, आजी शशिकला, इंदल पवार, पत्नी प्रमिला, मुलगा राहुल गौरव अशा सहा जणांचा समावेश आहे. त्यातच आजोबा तुळशीराम कॅन्सरग्रस्त असून. त्यांच्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती गौरव यांनी दिली.

Manora Farmer Loss
Groundnut Sowing : परभणी जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा सर्वाधिक

या प्रकरणी मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्याशी संपर्क साधून मदत करण्याबाबत आश्‍वासन दिले, अशी माहिती मुलगा गौरव इंदल पवार यांनी दिली.

शेती क्षेत्रात नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे. मात्र पीक वाचविण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक उपायोजनांचा अभाव आहे. वन्यजीवांपासून वाचलेला हा शेतीमाल पुढे बाजार समितीत विक्रीसाठी नेल्यानंतर त्या ठिकाणी शेतीमाल पाण्यापासून वाचावा याकरिता सुविधा राहत नाही.
इंदल पवार, शेतकरी. मो. ९३२२९३९९६७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com