
Parbhani News : परभणी जिल्ह्यातील २०२५ च्या उन्हाळी हंगामातील पेरणी क्षेत्र कृषी आणि महसूल विभाग यांनी सोमवारी (ता.२१) अंतिम केले आहे.त्यानुसार यावर्षी जिल्ह्यात ७ हजार ८५८ (७१.३८) हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांची ऊन्हाळी भुईमुगाला सर्वाधिक पसंती आहे.
यंदा तीळ,मूग,बाजरीच्या पेरणीत वाढ तर सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी घट झाली आहे. सिंचनासाठी पाणी असल्यामुळे गतवर्षीच्या ६ हजार ८८९ हेक्टरच्या तुलनेत यंदा ९६९ हेक्टरने वाढ झाली असली तरी सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ३ हजार १५० हेक्टरने घट झाली आहे.
परभणी जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ८ हेक्टर आहे.भूईमुग,बाजरी,मका या पारंपारिक पीकांसह गेल्या काही वर्षात तीळ,मूग,सोयाबीन पीकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे. भुईमुगाच्या पेऱ्यात गतवर्षीच्या ४ हजार २२९ हेक्टरच्या तुलनेत १ हजार ८०२ हेक्टरने वाढ होऊन यंदा ६ हजार ३१ हेक्टरवर पेरणी झाली.
परभणी तालुक्यात ६९८ हेक्टर,जिंतूर तालुक्यात २ हजार ४२१ हेक्टर,सेलू तालुक्यात ३८१ हेक्टर,मानवत तालुक्यात ५९७ हेक्टर, पाथरी तालुक्यात २६३ हेक्टर, सोनपेठ तालुक्यातील ९७.४० हेक्टर, गंगाखेड तालुक्यात १६८ हेक्टर,पालम तालुक्यात ५९ हेक्टर,पूर्णा तालुक्यात १ हजार ३४६ हेक्टर भुईमुगाची पेरणी झाली आहे.
तिळाच्या गतवर्षीच्या १६.२० हेक्टरच्या तुलनेत ८६ हेक्टरने वाढ होऊन यंदा १०३.१० हेक्टरवर पेरणी झाली. सोयाबीनच्या क्षेत्रात गतवर्षीच्या १ हजार ४११ हेक्टरच्या तुलनेत १ हजार १६९ हेक्टरने घट होऊन यंदा २४२.२० हेक्टरवर पेरणी झाली. यंदा परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम,पूर्णा सोयाबीनचा पेरा आहे.
मुगाच्या गतवर्षीच्या २० हेक्टरच्या तुलनेत १९ हेक्टरने वाढ होऊन यंदा ४९ हेक्टरवर पेरणी झाली.बाजरीच्या गतवर्षीच्या २०७ हेक्टरच्या तुलनेत १८४ हेक्टरने वाढ होऊन यंदा ३९१ हेक्टरवर पेरणी झाली.मक्याच्या गतवर्षीच्या ९३९ हेक्टरच्या तुलनेत क्षेत्रात ३५७ हेक्टरने घट झाली.यंदा सुर्यफुलाचा पेरा निरंक आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा उन्हाळी पेऱ्यात सेलू,मानवत,पाथरी,सोनपेठ,पूर्णा या पाच तालुक्यात वाढ तर परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम या तालुक्यात घट झाली आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तंत्राधिकारी (साख्यंकी) पुजा थिटे यांनी दिली.
परभणी जिल्हा उन्हाळी हंगाम २०२५ पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
भूईमूग ६७९६ ६०३१.३० ८८.७५
सोयाबीन २६६२ २४२.२० ९.१०
तीळ ११.२४ १०३.१० ९१७.२६
मूग ३२.४० ४९.७० १५३.४०
बाजरी ५०.२७ ३९१.७५ ७७९.२९
मका १३७७ ५८२.१० ४२.२६
परभणी जिल्हा उन्हाळी हंगाम २०२५ तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी ३१५० ७६८.७० २४.४०
जिंतूर ३९७५.३३ २४२१..६०.९०
सेलू २८०.६० ६६५.७० २३७.२४
मानवत ५५८.७३ ८५९.७० १५४.००
पाथरी ४२२.६६ ५८९ १३९.३३
सोनपेठ ४५९.७७ ६२०.८५ १३५.००
गंगाखेड ५८५.८६ २०८ ३६.००
पालम ३१२.२६ २२१ ७०.६८
पूर्णा १२६३.२२ १५०४.२० ११९.०८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.