AI in Watershed Development : जलसंधारण विकास कामासाठी वापरा 'एआय'; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे निर्देश

Amrut Sarovar Scheme : मंत्री चौहान यांनी शुक्रवारी (ता.४) अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण विकास आणि भूमी संसाधन विभागाच्या योजना आणि कार्यक्रमाचा आढावा घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना माती आणि आर्द्रतेवर आधारित सल्ला देण्याच्या सूचनाही मंत्री चौहान यांनी केली.
Minister Shivrajsingh Chauhan
Minister Shivrajsingh Chauhan Agrowon
Published on
Updated on

Digital Land Records: जलसंधारण विकास कामासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट थिंग्ज यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत.

मंत्री चौहान यांनी शुक्रवारी (ता.४) अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण विकास आणि भूमी संसाधन विभागाच्या योजना आणि कार्यक्रमाचा आढावा घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना माती आणि आर्द्रतेवर आधारित सल्ला देण्याच्या सूचनाही मंत्री चौहान यांनी केली. तसेच केंद्र सरकारच्या योजनांवर समाधान व्यक्त केले.

"लखपतती दीदी योजनेमुळे महिलांची एक चळवळ उभी राहिली. तसेच महिला शेतकऱ्यांची संख्या वाढून आता ४.५ कोटी इतकी झाली आहे. तसेच दूध उत्पादनाच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महिलांना पशुपालनात सहभागी करून घ्यावं. कारण कृषी व पशुपालन पूरक व्यवसाय आहेत. महिलांना या दोन्हींचे फायदे समजावून सांगून त्यांना यामध्ये सहभागी करून घ्यावं." असंही मंत्री चौहान म्हणाले.

Minister Shivrajsingh Chauhan
AI in Agriculture: ‘एआय’चा ५० हजार शेतकऱ्यांना फायदा होणार

देशात ९९ टक्के हक्क अभिलेख संगणकीकृत झाले असून ९७ टक्के भू नकाशे डिजीटाईज तर ९५ टक्के उपनोंदणी कार्यालय संगणकीकृत झाले आहेत, असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी चौहान यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यक्रमांची माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले.

तसेच नकाशा (NAKSHA) कार्यक्रम देशातील २९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील १५२ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू आहे. ६१ ठिकाणी एरियल सर्व्हे पूर्ण झाला आहे. उर्वरित ठिकाणचे कार्य जून २०२५ पर्यंत करण्याचे आदेशही चौहान यांनी दिले.

तसेच राजस्व न्यायालयांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वय साधण्याची सुचनाही चौहान यांनी केली. हक्क अभिलेखांमध्ये जमिनीच्या मालकाचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि पत्ता यांचा समावेश करून डेटा अधिक पारदर्शक व अचूक करण्याचे निर्देशही दिले.

मिशन अमृत सरोवर अंतर्गत देशात ५० हजार सरोवर तयार करण्याचे लक्ष्य होते, परंतु ते पार करत ६८ हजारांहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती पूर्ण झाली आहे. या अभियानात ८० हजार पंचायत प्रतिनिधी व ६५ हजार वापरकर्ता गट सक्रिय आहेत. हे गट या सरोवरांमधून कृषी, मत्स्यपालन, पर्यटन व मनोरंजन यासारख्या उपजीविकेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी असल्याचा दावाही मंत्री चौहान यांनी केला. 

दरम्यान, ग्रामीण विकास विभागाच्या या बैठकीत डोंगराळ भागात सिंचनाच्या सुविधा वाढवण्यासाठी योजना आखण्याची चर्चा झाली. तसेच त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री चौहान यांनी दिले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com