

Ajit Pawar on farmer loan waiver : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून शनिवारी (ता.२५) स्पष्टीकरण दिलं आहे. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असं कधी म्हणणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यात दौंडच्या सभेत माझ्या भाषणात कर्जमाफीचा उल्लेख कधी ऐकला का, असा सवाल उपस्थित करत कर्जमाफीला नकार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट संकेत दिले होते. त्यावरूनही राजकारण तापलं होतं. विरोधकांनी अजित पवारांवर टिका केली होती. त्यातच शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याची बातमी माध्यमांमध्ये शुक्रवारी चर्चेचा विषय ठरली. त्यावरून अजित पवारांनी शनिवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं.
अजित पवार म्हणाले, "मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असं कधी म्हणणार नाही. आम्ही देखील शेतकरी आहोत. जिथे शेतकऱ्याला मदत होईल, अशा गोष्टी करणीयचा प्रयत्न आम्ही करतो. मात्र धादांत खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे." असंही पवार म्हणाले. शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीत मतभेद असल्याची चर्चा जोरात सुरू आहेत.
भाजपने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू अशी ग्वाही दिली आहे. परंतु लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडल्याने शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यावरून विरोधकांनी टिका केली. परंतु शनिवारी मात्र अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देत शेतकरी कर्जमाफीला विरोध नसल्याचं सांगितलं.
यावेळी पवारांनी सुत्रांच्या मुद्द्यावरून माध्यमांना टोलाही लगावला. पवार म्हणाले," सुत्रांच्या हवाल्याने कर्जमाफीची बातमी देण्यात आली. पण मला बोलायचं असेल तर मी स्वत: बोलेन. तरीही प्रसारमाध्यमांकडून सुत्रांच्या हवाल्याने का बातम्या दिल्या जातात. या सूत्राला जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे." असा टोला पवारांनी लगावला. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठात ६० कोटींच्या आराखड्याला मान्यता दिल्याचंही पवारांनी सांगितलं. दरम्यान, राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलेला शब्द पूर्ण करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.