Crop Damage Survey : पंचनाम्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा ः फुंडकर

Heavy Rain Crop Loss : बाळापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे १५० घरांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे १८ गावांमध्ये तूर, सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
Crop Damage Survey
Crop Damage Survey Agrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्‍ह्यातील अतिवृष्टिग्रस्त भागात पंचनाम्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना आवश्यक मदत मिळवून द्यावी. एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये याची काटेकोर खबरदारी घ्यावी, असे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी येथे दिले.

अकोला जिल्ह्यातील पाऊस परिस्थिती, बाळापूर तालुक्यातील अतिवृष्टी, मदत आदी विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्या वेळी ते बोलत होते.

Crop Damage Survey
Kharif Crop Damage: उसासह खरीप पिके ‘हुमणी’च्या विळख्यात

आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आदी या वेळी उपस्थित होते. बाळापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे १५० घरांचे नुकसान झाले.

Crop Damage Survey
Wildlife Crop Damage : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील वानर, माकडांचा प्रश्न संसदेत

त्याचप्रमाणे १८ गावांमध्ये तूर, सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे सविस्तर व तपशीलवार पंचनामे करावेत. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये.

नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. शासन आपद्‍ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. नदीकाठांवरील गावे, वस्त्या, वाड्या आदी ठिकाणी सतर्कता बाळगावी व आवश्यक उपाय अंमलात आणावेत, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com