
Kolhapur Flood : महापुरासारखी परिस्थिती निर्माण केलेल्या पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतली होती. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. आज शहर आणि परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे, बंधारे भरले असून नदीची पाणीपातळी वाढल्याने १८ बंधारे पाण्याखाली आहेत.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ३९.१ मिमी पडला आहे. पुढील दहा दिवसांत जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दिड महिन्यात तीन वेळा नदी पात्राबाहेर गेली होती तर दोन वेळा नद्यांना पूर परिस्थिती पहायला मिळाली. दरम्यान होत असलेल्या पावसाने नदी काठच्या गावांसह शेती पिकाला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. अद्यापही सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
जिल्ह्यातील पाऊस (आकडे मिमीमध्ये)
हातकणंगले - ०.३, शिरोळ ०.२, पन्हाळा- १.३, शाहूवाडी - ११.१, राधानगरी - १६.२, गगनबावडा - ३९.२, करवीर - १.७, कागल - ३.१, गडहिंग्लज - ५.३, भुदरगड - १७.२, आजरा - ८.८, चंदगड - २६.७ एकूण ८.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
पाण्याखालील बंधारे
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, शेणगाव, चंदगड, खडक कोगे, दत्तवाड, सुळकूड, सिद्धनेर्ली व बाचणी, माणगाव, ऐनापूर व साळगाव असे एकूण १८ बंधारे पाण्याखाली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.