District Bank Scheme : जिल्हा बॅंकांच्या मदतीस लवकरच नवी योजना

Bank Scheme Help : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या मदतीसाठी लवकरच नवी योजना आणली जाईल, असे शिखर बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी स्पष्ट केले.
Vidyadhar Anaskar
Vidyadhar AnaskarAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या मदतीसाठी लवकरच नवी योजना आणली जाईल, असे शिखर बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी स्पष्ट केले. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. १७) पुण्याच्या साखर संकुल येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त दीपक तावरे तसेच जिल्हा बॅंकांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

श्री. अनास्कर म्हणाले, “सहकारी बॅंकिंग व्यवस्थेत तसेच कृषी पत पुरवठा नियोजनात जिल्हा बँका मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकांच्या अडचणी विचारात घेत राज्य सहकारी बॅंक एक योजना आखणार आहे.

जिल्हा बँकांना विश्‍वासात घेत मदत करण्यासाठी आमच्या पातळीवर पुढाकार घेतला जाईल. परंतु जिल्हा बॅंकांनी देखील आपापल्या पातळीवर व्यवहार जलद व पारदर्शक होण्यासाठी उपाय करायला हवेत.”

Vidyadhar Anaskar
Sangli District Bank : सांगली जिल्हा बँक राज्यात पहिल्या पाचमध्ये

या वेळी श्री. वळसे यांच्यासमोर जिल्हा बॅंकांच्या अडचणी मांडल्या गेल्या. “या बॅंकांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. बॅंकांच्या सेवांचा शेतकऱ्यांना अजून चांगला लाभ होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करावा.

तसेच आर्थिक अडचणीतील नाशिक व नागपूर या दोन्ही जिल्हा बॅंकांसाठी स्वतंत्र आराखडा रिझर्व्ह बॅंकेने मागविला आहे. हा आराखडा तयार करावा. राज्यात आवश्यक तेथे नव्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या तयार कराव्यात व जुन्या सोसायट्यांचे बळकटीकरण करावे,” अशा सूचना श्री. वळसे पाटील यांनी दिल्या.

Vidyadhar Anaskar
District Central Bank Funds : अमरावती विभागासाठी ‘ती’ अट शिथिल करा

आर्थिक अडचणीतील बॅंकांसाठी स्वतंत्र आराखडा करण्याची सूचना रिझर्व्ह बॅंक करीत असते. त्यामुळे राज्याने याबाबत कायमची एक यंत्रणा तयार करावी. आर्थिक संकटातील जिल्हा बॅंकांच्या मदतीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद असावी, अशी भूमिका जिल्हा बॅंकांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. परंतु निधीबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पीककर्ज वितरणाला वेग द्यावा

राज्यातील खरीप कर्जवाटपाचा आढावादेखील या वेळी घेण्यात आला. शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसा कर्जपुरवठा होतो आहे की नाही, याबाबत सहकार विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेने दक्षता घ्यावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र असूनही लाभ न मिळालेली प्रकरणे असल्यास निकाली काढावीत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com