Hi-Tech Agriculture : ‘हायटेक’ शेतीचा नवा हुंकार

New Development : शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Agriculture Exhibition
Agriculture ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शेतीच्या क्षेत्रातील अद्ययावत जागतिक तंत्रज्ञान विविध पिकांच्या डेमो प्लॉटच्या माध्यमातून जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी ही प्रात्यक्षिके उभी केली आहेत.

या महोत्सवाची आधुनिक तंत्रज्ञान आणि नवचैतन्य ही या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे. १४ जानेवारी २०२५ पर्यंत होणाऱ्या या महोत्सवाला शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या ‘संजीवन दिन’ निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Agriculture Exhibition
Kisan Agriculture Exhibition : शेतकऱ्यांच्या स्वप्नांना दिशादर्शक ‘शेत हसल’

‘सिक्स इन वन’ या संकल्पनेत उसाची शेती, कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व मल्चिंग फिल्मचा वापर करून लागवड केलेले क्षेत्र याचा समावेश आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाउस, ग्रीन हाउस यांसारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्या जात आहेत. यामध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, आले, लसूण यांसह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता व अनुभवता येणार आहे.

Agriculture Exhibition
Kisan Agricultural Exhibition : किसान कृषी प्रदर्शनात ‘स्वयं टॉक्स’तर्फे ‘शेत हसल’चे आयोजन

कृषी महोत्सवात १२ बैलगाड्यांची संकल्पना

आधुनिक काळात शेतीमध्ये बैलगाडी ही संकल्पना पुसट होत चालली आहे. ग्रामीण संस्कृतीचे जतन व्हावे आणि एक चांगला संदेश जावा यासाठी या महोत्सवात १२ बैल गाड्यांची संकल्पना उभारण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात यात्रा किंवा विशिष्ट तिथीला १२ गाड्या एकमेकांना बांधून एखादी व्यक्ती त्या ओढत असते.

त्या बैलगाडीवर गावातील लोक बसलेले असतात. याच संकल्पनेच्या धर्तीवर आधुनिक शेतीच्या तंत्राची, ठिबक सिंचन, पाइप, पाइप फिटिंग, फिल्टर्स इत्यादी बाबी, तंत्रज्ञान अशी जैन इरिगेशनची उत्पादने या गाड्यांवर पाहायला मिळतील. सेल्फीसाठी ‘जैन हायटेक एक्स्प्रेस’ कृषी रेल्वेची कलाकृतीही जैन इरिगेशनच्या कला विभागातील आर्टिस्टद्वारा उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी ही जैन हायटेक फार्मिंग एक्स्प्रेस कृषी क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याचे प्रतीक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com