
Nashik News : राज्यातील प्रमुख कांदा बाजार आवारांमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक वाढत असल्याने कांद्याच्या दरात क्विंटलमागे १,४०० रुपयांपर्यंत घसरण दिसून आली आहे. गेल्या सप्ताहापासून मागणीच्या तुलनेत पुरवठा सुरळीत होत असल्याने दर नरमल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यभरात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, पश्चिम महाराष्ट्रात नगर, सोलापूर, पुणे तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आवक वाढत आहे. नोव्हेंबरअखेर राज्यभरात बाजार समित्यांमध्ये आवक सर्वसाधारण होती. खरीप कांद्याचे आगार असलेल्या उत्तर महाराष्ट्रात यंदा मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे कांद्याच्या प्रतवारीत घसरण दिसून आली. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने कांदा दरात डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत सुधारणा दिसून आली.
यापूर्वी आवक दबावात असल्याने दर टिकून होते. मात्र डिसेंबरपासून आवक टप्प्याटप्प्याने वाढून दरवर्षीप्रमाणे हंगामात स्थिर झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहानंतर प्रतिक्विंटल दर ३,५०० ते ३,७०० रुपयांदरम्यान दर स्थिर होते. मात्र आता दर कमी झाले आहेत.
सोलापूरमध्ये सर्वाधिक आवक
राज्यात सर्वाधिक आवक सोलापूर बाजार समितीत सप्ताहाच्या सुरुवातीला दिसून आली. महाराष्ट्र राज्य कृषी पालन मंडळाच्या माहितीनुसार येथे ४९,६५३ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याला किमान १००, कमाल ५००० तर सरासरी २,०५० रुपये दर मिळाला. मागील सप्ताहाच्या तुलनेत क्विंटलमागे १,३५० रुपये घसरण झाली, तर आवक वाढली आहे. लासलगाव येथे मागील सप्ताहात आवकेत चढ उतार दिसून आली; मात्र मागील सप्ताहाच्या तुलनेत सुरुवातीलाही आवक कमी झाली. क्विंटलमागे दर १,३५० रुपयांनी कमी झाले तर पिंपळगाव बसवंत येथेही आवक वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे दर १,४५० रुपयांनी कमी झाले.
गुजरातमधून आवक वाढली
गुजरात राज्यातील महूवा, भावनगर, गोंडल परिसर मध्य प्रदेशमधील सेंधवा परिसरात कांद्याची आवक वाढत आहे. तर राज्यात नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यात हे चित्र आहे. याशिवाय प्रतवारीत सुधारणा दिसून आली आहे. याशिवाय भारतीय कांद्याच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क कायम असल्याने त्यांचा फटका मागणीला असल्याने दर कमी झाल्याचे चित्र आहे.
मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत आवक वाढल्याने पुरवठ्यावरील ताण काहीसा कमी होत असल्याने दर कमी झाल्याचे लासलगाव (जि. नाशिक) येथील कांदा व्यापारी व निर्यातदार मनोज जैन यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.
राज्यातील प्रमुख बाजारातील स्थिती :(आवक/ सरासरी दर)
बाजार समिती...सोमवार (९ डिसेंबर)... सोमवार (१६ डिसेंबर)
सोलापूर...३२,७१४/३४००...४९,६५३/२०५०
लासलगाव...२९,४३५/३,७००...१७,६००/२,३५१
पिंपळगाव बसवंत...१४,५७९/३,८५०...२१,०००...२,४००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.