Paddy Variety : ताणसहनशील भाताच्या जाती देणार ३० टक्के अधिक उत्पादन

Stress Tolerant Paddy Crop : भात उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढीचा दावा असणाऱ्या ताणसहनशील ‘डीआरआर धान १०० (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राइस १’ या दोन जातींचे प्रसारण केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आल्या.
Paddy Variety
Paddy Variety Agrowon
Published on
Updated on

New Delhi News : भात उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढीचा दावा असणाऱ्या ताणसहनशील ‘डीआरआर धान १०० (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राइस १’ या दोन जातींचे प्रसारण केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आल्या. अवर्षणात पाण्याच्या ताणसहनशील आणि नत्र वापरायची उच्च कार्यक्षमता असलेल्या या दोन जातींची महाराष्ट्रासह चौदा राज्यांकरिता शिफारस करण्यात आली आहे.

एनएएससी कॉम्स्लेक्स येथील भारतरत्न सी. सुब्रह्मण्यम ऑडिटोरियम येथे रविवारी (ता.४) आयोजित एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री श्री. चौहान प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय कृषी सचिव देवेश चौधरी, ‘आयसीएआर’चे महासंचालक मांगीलाल जाट हे उपस्थित होते. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) या हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देणे आणि भात उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यासाठी या जाती विकसित केल्या आहे.

मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाणाऱ्या सांबा महसुरी (बीपीटी ५२०४) आणि एमटीयू १०१० (कोट्टोंडोरा सन्नालू) या दोन ताणसहनशील, उत्पादन आणि हवामान अनुकूल आणि मूळ क्षमता टिकवून ठेवणाऱ्या या वाणांपासून शास्त्रज्ञांनी ‘डीआरआर धान १०० (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राइस १’ या दोन जाती विकसित केल्या आहेत. दोन्ही जातींमध्ये दुष्काळात पाण्याच्या ताणासह सहनशील आणि नत्र वापरायची उच्च कार्यक्षमता आहे.

Paddy Variety
Paddy Variety : किमया काळ्या भाताची!

याप्रसंगी बोलताना कृषिमंत्री श्री. चौहान म्हणाले, ‘‘प्रगत तंत्रज्ञानाचा शोध घेऊन शेती क्षेत्राचा विकास केल्याशिवाय भारत विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करू शकत नाही. नवे जनुकीय संपादित बियाणे हे भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी गरज अधोरेखित करतात. भारताचे कडधान्य आणि तेलबिया आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘आयसीएआर’च्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न वाढवावेत. ’’

कृषिमंत्री श्री. चौहान म्हणाले, ‘‘देशाच्या अन्न सुरक्षेसाठी आणि भारताला ‘जगातील अन्नधान्य बास्केट’ बनविण्यासाठी संशोधक शास्त्रज्ञ महत्त्वाचे आहेत. सध्या भारत ४८ हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ निर्यात करतो. तरीही, पौष्टिकतेने समृद्ध अन्न सुनिश्‍चित करण्याची आवश्यकता आहे. ही जबाबदारी आपल्या कृषी शास्त्रज्ञांच्या खांद्यावर आहे.’’

Paddy Variety
Paddy Variety : दुर्मीळ भातवाण जपण्यासोबतच कंपनीने साधली प्रगती

कृषिमंत्र्यांचा नवा ‘फार्म्यूला’

या कार्यक्रमप्रसंगी कृषिमंत्री श्री. चौहान यांनी ‘वजा पाच, अधिक १०’ हे एक नवीन सूत्र सुचविले. ते म्हणाले, ‘‘भाताचे क्षेत्र ५० लाख हेक्टरने कमी करून उत्पादन एक कोटी टनांनी वाढवावे. हे कमी झालेले क्षेत्र कडधान्य आणि तेलबियांकडे उत्पादनाकडे वळवावे.’’

कृषी सचिव श्री. चौधरी म्हणाले, की प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन भाताच्या जाती विकसित करण्यात आल्या, प्रत्येक जातीचे उत्पादन, लवचिकता आणि गुणवत्तेचे वेगळे फायदे आहेत. तर ‘आयसीएसआर’चे महासंचालक श्री. जाट म्हणाले, की भारतीय कृषी क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी चांगल्या बियाण्यांच्या जाती विकसित करण्यावर भर दिला जाईल.

दरम्यान, जनुकीय संपादित तांदळाच्या जाती यापूर्वी चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये विकसित केल्या गेल्या आहेत, परंतु त्यापैकी अनेक संशोधन क्षेत्रातच राहिले आणि त्यापैकी काही औपचारिक प्रसारण किंवा व्यावसायिकीकरणापर्यंत पोहोचल्या आहेत.

या राज्यांत होणार प्रसार --

आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, पुद्दूचेरी, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्‍चिम बंगाल.

जातींचे वैशिष्ट्ये...

‘डीआरआर धान १०० (कमला)’ हे वाण आपल्या मूळ जातीच्या तुलनेत २० दिवस आधी (१३० दिवसांत) पक्वता गाठते. लवकर काढणीला येत असल्याने पुढील हंगामातील पिके साधता येणे शक्यता होते. तर ‘डीआरआर धान १०० (कमला)’ या वाणामुळे पिकाला देण्यासाठीचे किमान तीन सिंचन वाचते.

‘‘या नव्या दोन्ही जातींमुळे भाताचे उत्पादन २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढेल. पाण्याची बचत होईल, भात लागवडीतून हरितवायू उत्सर्जन कमी होईल. या जातींची देशांत ५० लाख हेक्टरवर लागवड झाल्यास अतिरिक्त ४५ लाख टन भात उत्पादनात वाढ होईल. या दोन्ही जाती लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील.’’
- शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com