New Board of Directors : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर नवे प्रशासकीय संचालक मंडळ

Shri Adinath Sugar Factory : करमाळ्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्रशासकीय संचालक मंडळ नेमण्यात आले आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Solapur News : करमाळ्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्रशासकीय संचालक मंडळ नेमण्यात आले आहे. या मंडळात विलासराव घुमरे, डॉ. वसंत पुंडे, अॅड. दीपक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मागील महिन्यात करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे व पुन्हा एकदा सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे, यासाठी अकलूजला सर्व गटांची बैठक बोलावली होती.

Sugar Factory
Olam Sugar Factory : ओलम साखर कारखान्याकडून आता मका व तांदळापासून इथेनॉल निर्मिती

या बैठकीला माजी आमदार जयवंतराव जगताप, नारायण पाटील, विलासराव घुमरे यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी होती. या बैठकीत तालुक्यातील प्रमुख गटांच्या प्रमुख नेत्यांनी सकारात्मक विचार व्यक्त करून आमदार मोहिते-पाटील यांनी आदिनाथसाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले होते.

कारखान्यावर साधारणपणे २५० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जातून कारखान्याला बाहेर काढण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांची होणारी हेळसांड लक्षात घेत आदिनाथ कारखाना चालू होणे गरजेचे आहे. तसेच पहिल्या प्रशासकीय संचालक मंडळाची मुदत आता अलीकडेच संपली होती.

Sugar Factory
Sugar Factory : सांगली जिल्ह्यातील सहा कारखान्यांची धुरांडी थंडावली

त्यांना नव्याने मुदत वाढ देण्याऐवजी नवीन प्रशासकीय संचालक मंडळ नेमण्यात आले आहे. त्यात स्वतः आमदार मोहिते पाटील यांच्यासह अन्य तिघांचा समावेश केला आहे. जुन्या प्रशासकीय मंडळातील प्राधिकृत अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती मात्र कायम ठेवली आहे.

आदिनाथ कारखाना अडचणीत आहे. अशा स्थितीत माझी प्रशासक म्हणून नेमणूक करताना माझ्यावर जो विश्‍वास दाखवला, त्या विश्‍वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. प्रामाणिकपणे काम करून आदिनाथ कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करू.
विलासराव घुमरे, प्रशासकीय संचालक, आदिनाथ सह. साखर कारखाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com