Rural Education Update : नेरळमधील झुगरेवाडीत इंग्रजी शिक्षणाचे ‘एटीएम’ अवतरले

Education : ग्रामीण भागात मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. मात्र, मुलांचे गुरुत्व स्वीकारलेल्या शिक्षकांकडून कायम मुलांना उत्तम शिक्षण कसे देता येईल, यासाठी प्रयत्न केले जातात.
Rural Education Update
Rural Education Update Agrowon
Published on
Updated on

Neral Education News : ग्रामीण भागात मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. मात्र, मुलांचे गुरुत्व स्वीकारलेल्या शिक्षकांकडून कायम मुलांना उत्तम शिक्षण कसे देता येईल, यासाठी प्रयत्न केले जातात. असेच काहीसे वेगळे प्रयत्न कर्जत तालुक्यातील आदिवासीवाडी असलेल्या झुगरेवाडीत पाहायला मिळत आहेत.

या वाडीत चक्क शिक्षणाचे एटीएम अवतरले आहे. एटीएम म्हणजे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र या संस्थेचे सदस्य असलेले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रवी काजळे यांनी हा उपक्रम वाडीत राबवला आहे. सुट्टीत मुलांना शिक्षणाचा विसर पडू नये, यासाठी वाडीतील घरांवर इंग्रजी शब्द, वाक्य रंगवण्यात आले आहेत.

कर्जत तालुक्याचे टोक म्हणजे झुगरेवाडी. झुगरेवाडी रायगड जिल्ह्यात येत असून ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. या वाडीत २०० हून अधिक आदिवासी कुटुंबे राहतात. ही वाडी दुर्गम भागात असून आजूबाजूला घनदाट जंगल आणि निर्मनुष्य रस्ता आहे. याच वाडीत जिल्हा परिषदेची शाळा आहे.

पहिली ते आठवी अशी शाळा असून, साधारण १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ही शिक्षकांची संस्था आहे. त्याचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ, एससीआरटीच्या उपसंचालक नेहा बेलसरे, भाषा विभागप्रमुख कल्पना देवी आवटे आदी प्रमुख आहेत.

Rural Education Update
Education Update : शिक्षणाचे बाजारीकरण कधी थांबणार?

या संस्थेने ग्रामीण भागातील मुलांना सुट्टीमध्ये शिक्षणाचा विसर न पडावा यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम सुरू केला. यामध्ये जालना जिल्ह्यातील गणित विषयाचे गणेशपूर, तर रायगड जिल्ह्यातील इंग्रजीची झुगरेवाडी असे दोन उपक्रम होते.

झुगरेवाडी येथील जबाबदारी रवी काजळे यांनी स्वीकारून वाडीतील विद्यार्थ्यांना आणि रंगकाम करणारा एक सहकारी घेत उपक्रमाची सुरुवात केली. मुलांनी हाताने इंग्रजी वाक्य रंगवली. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे वसंत पारधी, शिक्षक शरद नागटिळक यांनी मदत केली.

वाडीतील एकूण १४ घरांवर रंगकाम करून त्यावर इंग्रजी शब्द, चित्र, वाक्य रेखाटण्यात आली. यामुळे वाडीतील घरे वेगळी दिसायला लागली. विविध रंगीत चित्रे, आकृती मुलांना आकर्षित करतात. शाळेच्या सुट्टीत मुलांच्या डोळ्यासमोर इंग्रजी शब्द राहिल्याने ते सतत वाचनात राहिले.

यासह मुलांचा सुट्टीतील मोबाईलचा वापरही कमी झाला. याचा फायदा आता मुलांना होत असल्याचे पालक सांगतात. झुगरेवाडी आता शिक्षणाच्या एटीएमची झुगरेवाडी म्हणून समोर आली आहे.

Rural Education Update
Education : नक्षलप्रवण भागातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण

शाळेचे रुपडे पालटले

या शाळेवर २०१६ मध्ये रवी काजळे या शिक्षकाची नेमणूक झाली. त्या वेळी शाळेच्या वर्गखोल्यांची पडझड झालेली होती. त्यांनी ग्रामस्थांनासोबत दुरुस्तीचे काम हाती घेतले. अनेक मदतीचे हात पुढे आले. त्यातून शाळेचे काम सुरू झाले. वर्गखोल्या सुस्थितीत झाल्या.

त्यानंतर गरज होती पाण्याची. त्यामुळे सहकार आयुक्त प्रदीप महाजन यांच्यामुळे गीतगुंजन व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून डोंबिवलीच्या रोटरी क्लबशी संपर्क साधला. त्यांनी बोअर मारून दिली. अनेक उपक्रम राबवत शिक्षक काजळे यांनी झुगरेवाडी शाळेचे रूप बदलले. याचीच दखल महाराष्ट्र सरकारने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com