Education : नक्षलप्रवण भागातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण

Education Update : नक्षलप्रवण आणि दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणाची टक्‍केवारी कमी आहे. त्यामुळेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने ‘विद्यापीठ आपल्या गावात’ ही अभिनव संकल्पना राबविली आहे.
Education
EducationAgrowon
Published on
Updated on

Gadchiroli News : नक्षलप्रवण आणि दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणाची टक्‍केवारी कमी आहे. त्यामुळेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने ‘विद्यापीठ आपल्या गावात’ ही अभिनव संकल्पना राबविली आहे. राज्यात अशाप्रकारचा उपक्रम राबविणारे हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

Education
Education Policy : नापास मुलांचं खच्चीकरण सरकारच करतंय?

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. या संकल्पनेअंतर्गत रात्री सहा ते ९ या वेळेत विद्यापीठाचे तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन वर्ग घेतात.

पहिल्या टप्प्यात जांभळी गावातील महाविद्यालय सोडलेल्या २२ विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना बी.ए. या पदवी अभ्यासक्रमामध्ये पुर्नप्रवेश देण्यात आला आहे. त्यांना शिकविण्याकरिता तज्ज्ञ प्राध्यापक उपलब्ध करून दिलेल्या वाहनाने जातात.

तासिका घेतात आणि रात्री उशिरा परत येतात. महिला प्राध्यापिकांना त्यांच्यासोबत महिला सुरक्षारक्षक गार्डसुद्धा विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

स्वयंरोजगाराकरिता प्रशिक्षणही

पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशीत विद्यार्थ्यांना पुढे गरज भासल्यास स्वयंरोजगार करता यावा यावरही भर देण्यात आला आहे. त्याकरिता बीए कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात बांबू क्राफ्टचा जाणीवपूर्वक समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडच्या संसदेत शी इंसपिरेस पुरस्कार मिळालेल्या जगप्रसिद्ध बांबू प्रशिक्षक मीनाक्षी मुकेश वाळके या विद्यार्थ्यांना बांबू क्राफ्टचे प्रशिक्षण देत आहेत. मीनाक्षी यांना द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र असेही म्हटले जाते. बांबू डिझाईनमध्ये पाच नवे प्रयोग तसेच ‘बांबू क्‍यूआर’ संकल्पनाही त्यांनी साकारली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com